घरताज्या घडामोडीभाजपच्या आंदोलनाला भुजबळांचा पाठींबा

भाजपच्या आंदोलनाला भुजबळांचा पाठींबा

Subscribe

ओबीसी आरक्षणासाठी पुढे येणार्‍या सर्वांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रदद झाल्याने हे आरक्षण पुन्हा मिळावे या मागणीसाठी आता भाजपने चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. भाजपच्या या आंदोलनाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाठींबा दर्शवला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आवाज उठवणार्‍या सर्वांच्या पाठीशी आपण उभे राहू असेही ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी केले. या संदर्भात नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ओबीसी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत भाजपनेही २६ जून रोजी ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, ओबीसींसाठी भाजप आंदोलन करत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ओबीसींच्या आरक्षणासाठी त्यांनी केंद्र स्तरावरही पाठपुरावा करावा. जनगणना आणि डेटा हा विषय केंद्राकडे आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. त्याला अद्याप उत्तर आले नाही. केंद्र सरकार टोलवाटोलवी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्य सरकार आणि ओबीसी संघटना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

ओबीसी च्या मुद्यावर मी देवेंद्र फडणवीस यांच्यांशी फोनवर बोललो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी संपर्क करून तोडगा काढण्यासाठी सुचवले आहे. कोरोना काळात इंपेरीकल डाटा जमा करण्याचे काम आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राने हा डाटा उपलब्ध करून द्यावा, अशी सरकारची मागणी असल्याचं भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, पंकजा मुंडे यांच्यां भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला.

मी शिवसेनेच्या जुन्या प्रवाहातला
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देतांना त्यांनी खासदार संजय राउत यांना टोला लगावला. नवी मुंबई विमानतळाच्या मुददयावर नाशिक दौर्‍यावर असतांना खासदार राऊत यांनी भुजबळांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहित नाही असे वक्तव्य केले होेते. शिवसेनेच्या वर्धापनदिनामित्त शुभेच्छा देतांना भुजबळ म्हणाले, मला नवा प्रवाह माहीत नाही असे संजय राऊत म्हणाले होते पण मी शिवसेनेच्या जुन्या प्रवाहातील आहे
25 वर्ष शिवसेनेत काम केले आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -