घरCORONA UPDATEकोरोनाबाधित मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची नुकसान भरपाई देणे अशक्य, केंद्राने सर्वोच्च...

कोरोनाबाधित मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची नुकसान भरपाई देणे अशक्य, केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिले स्पष्टीकरण

Subscribe

नुकसान भरपाई देणे राज्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक

देशभरात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण आज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना मदत करण्यास केंद्र असक्षम आहे. त्यामुळे केंद्राकडून मदत मिळणे अशक्य आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींसाठीच नुकसान भरपाईची तरतूद असल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरणे केंद्राने सरकारने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

नुकसान भरपाई देणे राज्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक

यावर केंद्राने पुढे सांगितले की, एखाद्या रोगामुळे मृत पावणाऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली आणि दुसऱ्या आजारामुळे मृ्त्यू होणाऱ्यांना ती दिली नाही तर ते पूर्णपणे चुकीचे ठरणार आहे. तसेच प्रत्येक कोरोनाबाधित मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणे राज्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या याचिकेत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कोरोना संक्रमणामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची विनंती केंद्र आणि राज्य सरकारला करण्यात आली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार व त्याचा परिणामांसाठी नैसर्गिक आपत्तींसाठीचा निधी भरपाई म्हणून देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे कोरोना महामारीसाठी हा निधी लागू करणे शक्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारला कर महसूल कमी मिळत असल्याने आणि आरोग्य खर्चात वाढ झाल्याने आधीच गंभीर आर्थिक दबावाखाली आहेत. अशावेळी नैसर्गिक आपत्तीं व्यावस्थापनेचा निधी कोरोना साथीच्या रोगावर आणि आरोग्यावर खर्च करणे नुकसानकारक होऊ शकते. कारण देशात कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ लाख ८५ हजार मृत्यू झाले आहेत तर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणातील कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची नुकसान भर देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.


धक्कादायक! मुंबईतील २१ तरुणाकडे आढळली १० पिस्तुलांसह १२ मॅगजीन, पोलिसांनी केली अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -