घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात किडे

मालेगावात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात किडे

Subscribe

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते की काय? असा प्रश्न पालकवर्ग विचारत आहे.

शहरातील मालेगाव कॅम्प भागातील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणार्‍या पोषण आहारात किडे, सापडल्याने पालक वर्गात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, इतके निकृष्ट पोषण आहार देताना महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते की काय? असा प्रश्न पालकवर्ग विचारत आहे.

शासनातर्फे शालेय पोषण आहार अंतर्गत मुलांना पोषक आहार म्हणून गहू, हरबरा, डाळी, अंडी, तांदूळ पुरवले जाते. कोणीही विद्यार्थी कुपोषित राहू नये, त्याच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. या उदात्त हेतूने शासनाने ही योजना सुरू केली आहे. मात्र असे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा होतोच कसा? महापालिकेचा शालेय शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नाही काय? किड लागलेली धान्याची पाकिटे यांना आढळून आले नाहीत का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. आधीच महापालिका पोषण आहार योजनेत अनेक किस्से या पूर्वी झालेले आहेत तरीही हा विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. याचेच नवल वाटते.

- Advertisement -

नुकत्याच वाटप झालेल्या गहू पाकिटात गव्हाचे अक्षरशः पीठ झाले असून किड लागल्याचे दिसून येत आहे. हरबरा पाकिटात हाच प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी असले खराब धान्य वाटप करणार्‍या महापालिका शालेय शिक्षण पोषण आहार विभागाची चौकशी करून कडक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा वंदेमातरम् संघटनेतर्फे शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -