घरटेक-वेकसॅमसंगचे २ नवे फोन लाँच, किंमत आणि फिचर्स

सॅमसंगचे २ नवे फोन लाँच, किंमत आणि फिचर्स

Subscribe

सॅसमंगच्या J सिरीजमध्ये आजवर आलेल्या फोन्सच्या तुलनेत, Galaxy J4 आणि Galaxy J6 प्लस या दोन्ही फोनमध्ये सर्वात आकर्षक फिचर्स असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

मोबाईल निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणजे Samsung ही कंपनी. सॅमसंग कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गॅजेट्सची निर्मिती करत असते. याच धर्तीवर सँमसंगने Galaxy J6 प्लस आणि Galaxy J4 हे २ नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे दोनही स्मार्टफोन्स सॅमसंग इंडियाच्या J श्रेणीमधील नवीन मॉडेल्स आहेत. दरम्यान या दोन्ही फोनची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. गॅलक्सी J4 या मोबाईलची किंमत १० हजार ९९० रुपये तर J6 प्लसची किंमत १५ हजार ९९० रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोन्सना ६ इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅसमंगच्या J सिरीजमध्ये आजवर आलेल्या फोन्सच्या तुलनेत, Galaxy J4 आणि Galaxy J6 प्लस या दोन्ही फोनमध्ये सर्वात आकर्षक फिचर्स असल्याचं, सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष मोहमदीप सिंग यानी सांगितलं आहे. सॅमसंग लव्हरसाठी तसंच नव्याने स्मार्टफोन खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी हे दोन नवीन फोन चांगला पर्याय ठरु शकतात.

Galaxy J4 आणि J6 प्लसचे फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी J4

  • 6 इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले
  • 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट मेमरी स्टोरेज
  • 13 मेगापिक्सल सिंगल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • स्पॅनड्रॅगन 425 प्रोसेसर
  • 3 हजार 300 Mah क्षमतेची बॅटरी
  • एमएम हेडफोन जॅक

सॅमसंग गॅलेक्सी J6 प्लस

  • 6 इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले
  • 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट मेमरी स्टोरेज
  • 13 मेगापिक्सल सिंगल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 3 हजार 300 Mah क्षमतेची बॅटरी
  • एमएम हेडफोन जॅक

वाचा : Nokia चा ५ कॅमेरांचा नवा स्मार्टफोन
खास टीप्स : स्मार्टफोन असल्यास, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -