घरताज्या घडामोडीट्विटरचा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना झटका, तासभर लॉगईन Access रोखला

ट्विटरचा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना झटका, तासभर लॉगईन Access रोखला

Subscribe

ट्विटरने भारतीय नियमांची अंमलबजावणी केली नाही तर भारतातून ट्विटरला बॅन करण्यात येईल

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटरचा तासभर लॉगइन अॅक्सेस ट्विटरकडून रोखण्यात आला होता. याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना मंत्री रविशंकर प्रसाद यांना देण्यात आली नव्हती. तासभर लॉग इन न करु दिल्यामुळे रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्याविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे. लॉग इन परवाना दिल्यानंतर त्यांनी ट्विट करत या सर्व घटनेची माहिती दिली आहे. रविशंकर प्रसाद यांच्याविरोधा अमेरिकेतील कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती अशी माहिती स्वतः रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्विटरकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना लॉगइन परवानगी दिल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या प्रसांगाची माहिती दिली आहे. एक स्क्रीनशॉट सामायिक करुन मंत्र्यांनी माहिती दिली की ट्विटरने त्यांना जवळपास एक तासाहून जास्त वेळ लॉगइन करण्यापासून रोखून ठेवले होते. त्यांनी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. तसेच काही वेळानं ट्विटर वापरण्याची परवानगी दिली गेली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

- Advertisement -

ट्विटरने केलेल्या कारवाईचा निषेध करुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे की, ट्विटरने केलेल्या कारवाईबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. तसेच ही कारवाई म्हणजे माहिती तंत्रज्ञान २०२१ मधील नियम ४(८) चे उल्लंघन आहे. ट्विटरच्या नियमावलीविरोधात माध्यमांमध्ये आवाज उठवणे आणि मत मांडल्यामुळे ट्विटरने कारवाई केली असल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

- Advertisement -

भारताच्या नियमांची अंमलबजावणी ट्विटर का करत नाही आहे आता स्पष्ट झाले आहे. परंतु त्यांच्या कृतीत न बसणाऱ्या व्यक्तींचे ते खाते लॉगइन परवानगी न देऊन बंद करु शकत नाहीत. असा इशारा रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरला दिला आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या क्लिप्स, मांडलेली मते यांच्याविरोधात कोणाही तक्रार केली नाही. ट्विटरनं ज्या प्रकारे कारवाई केली आहे. यामुळे भाषण स्वातंत्र्य असल्याचे दिसत नाही आहे. ट्विटरला स्वतःची नियमावली महत्त्वाची आहे. जर ट्विटरने आमच्या नियमांची अंमलबजावणी केली नाही तर भारतातून ट्विटरला बॅन करण्यात येईल कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय नियमांची अंमलबजावणी करावीच लागेल असा उघड इशारा ट्विटरला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -