घरअर्थजगत7th Pay Commission: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Gift; सप्टेंबरच्या पगारामध्ये येणार 'ही'...

7th Pay Commission: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Gift; सप्टेंबरच्या पगारामध्ये येणार ‘ही’ रक्कम

Subscribe

तुम्ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहात का? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तब्बल ५२ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी लवकरच चांगले दिवस येणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला महागाई भत्ता जुलैच्या पगारामध्ये येणे अपेक्षित होते, परंतु आता तो सप्टेंबरच्या शेवटी मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे नुकतेच सांगितले जात आहे. इतकेच नाही तर तीन महिन्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरमध्येच येणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच हा भत्ता दिवाळी भेट म्हणून मिळेल अशी अपेक्षा आहे.

११ टक्क्यांनी वाढणार वाढीव महागाई भत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पगारामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) सोबत शेवटचे तीन थकबाकीही दिली जाणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम येणार आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त व डीओपी मंत्रालय यांच्यासह झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की. सप्टेंबर २०२१ पासून महागाई भत्ता व महागाई सवलत देण्यात येणार आहे. म्हणूनच तुम्ही केंद्रिय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. महागाई भत्ता पुनर्संचयित झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये तुमच्या पगारात किती वाढेल होईल हे जाणून घ्या. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना १७ % दराने महागाई भत्ता मिळत आहे. परंतु यामध्ये डीएची म्हणजेच वाढीव महागाई भत्ता अधिक झाल्यानंतर हा भत्ता ११ टक्क्यांनी वाढून २८ टक्के होईल. म्हणजेच १ जुलै २०२१ च्या मूलभूत वेतनातून डीएमध्ये ११ टक्के वाढ होणार असून हेच गणित डीआरसाठी देखील लागू असणार आहे.

- Advertisement -

दोन महिने करावी लागणार प्रतीक्षा 

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सप्टेंबरच्या पगारामध्ये चांगली वाढ होणार असून नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिवा गोपाल मिश्रा यांनी असे सांगितले की, जानेवारी २०२१ आणि जुलै २०२१ मधील महागाई भत्ता (DA) जाहीर करण्यात येईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासोबतच क्लास १ मधील कर्मचार्‍यांच्या डीएची थकबाकी ११ हजार ८८० ते ३७ हजार ५५४ रुपये असणार आहे. लेव्हल -१३ म्हणजेच CPC ची मूलभूत वेतनश्रेणी १ लाख २३ हजार १०० ते २ लाख १५ हजार ९०० रुपये किंवा लेव्हल १४ साठी ही थकबाकी मोजली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याच्या डीएची थकबाकी १ लाख ४४ हजार २०० रूपये ते रू. २ लाख १८ हजार २०० रुपयांदरम्यान असणार आहे.


India Corona Update: दिलासा! नव्या बाधितांसह मृतांचा आकडा घटला; ३९,७९६ नवे रूग्ण, ७२३ मृत्यू
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -