घरताज्या घडामोडीदहशतवाद्यांनंतर नक्षलवाद्यांकडून सुरक्षादलाची 'रेकी' करण्यासाठी ड्रोनचा वापर

दहशतवाद्यांनंतर नक्षलवाद्यांकडून सुरक्षादलाची ‘रेकी’ करण्यासाठी ड्रोनचा वापर

Subscribe

जम्मू येथील हवाईदलाच्या तळावर दहशतवाद्यांनी ड्रोनने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनीही ड्रोनचा वापर शस्त्र म्हणून करण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू येथील हवाईदलाच्या तळावर दहशतवाद्यांनी ड्रोनने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनीही ड्रोनचा वापर शस्त्र म्हणून करण्यास सुरुवात केली आहे.नक्षलवादी सुरक्षा दलाच्या हालचालींवर ड्रोनच्या माध्यमाने वॉच ठेवत असल्याचे समोर आले आहे.

नक्षलप्रभावित क्षेत्र असलेल्या सुकमा येथील दोरनापाल येथेही दोन संशयित ड्रोन दिसले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी नक्षली भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलाला सतर्क राहण्याच्या इशारा दिला आहे. ज्या भागात ड्रोन दिसले तेथून जवळच सुरक्षा दलाचा तळ आहे. यामुळे सुरक्षा दलाच्या हालचालीं टिपण्यासाठीच हे ड्रोन नक्षलवाद्यांनी पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ड्रोन दिसल्यानंतर मल्टी एजन्सी सेंटरमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत छत्तीसगडमध्ये नक्षल प्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या टिमला सुचना देण्यात आल्या.

- Advertisement -

सुकमा बस्तर भागासह अनेक भागात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे हे भाग नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर असून या भागात हल्ला करण्याचा कट नक्षलवाद्यांनी रचल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. याचदरम्यान, या भागात आता ड्रोन दिसल्याने सुरक्षा दलही सतर्क झाले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -