घरताज्या घडामोडीचेंबूर सिद्धार्थ नगरच्या ७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज AEML कापणार

चेंबूर सिद्धार्थ नगरच्या ७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज AEML कापणार

Subscribe

सिद्धार्थ कॉलनी चेंबुर येथिल ज्या ७०० ग्राहकांनी दोन वर्षांपासून वीज बिलांचा भरणा केलेला नाही, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी एइएमएलची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ने सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे गेल्या दोन वर्षांपासून वीज बिले न भरणाऱ्या सुमारे ७०० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. एइएमएलकडून सिद्धार्थ कॉलनीत सध्या जवळपास ३,२५० ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. एईएमएलमार्फत आज ३५ जणांचा वीज पुरवठा कापला जाणार होता. पण कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच आज केवळ १५ जणांचाच वीज पुरवठा खंडित झाला अशी माहिती आहे.

एइएमएल कडून जुलै २०१९ मध्ये पूर्वीची थकबाकी गोळा करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची सामुदायिक स्तरावर विशेष मोहीम राबवली गेली. यावेळी विविध राजकीय पक्षांनी मध्यस्थी केली व स्थानिक नागरिकांनीही चालू महिन्यापासून वीज देयकांचा भरणा करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानुसार हि विशेष मोहीम स्थगित करण्यात आली. त्यानंतर बहुतांश ग्राहक हे आपपल्या वीज देयकांचा नियमित भरणा करत आहेत, मात्र हे ७०० ग्राहक याला अपवाद आहेत. ही थकबाकीची रक्क्क्म आता २.५ कोटी रुपये इतकी झाली आहे.

- Advertisement -

सुमारे ८०% ग्राहक हे नियमितपणे त्यांच्या वीज देयकाची भरणा करत आहेत, जवळपास २०% (७००) ग्राहक यांनी मात्र गेल्या दोन वर्षांपासून विजेचा वापर करूनसुद्धा देयकाचा भरणा करण्यास नकार देत आहेत. याचा बोजा सर्वसामान्य ग्राहक जे नियमित पणे वीज देयकांचा भरणा करत आहेत त्यांच्यावर पडत आहे. यामुळेच जे ग्राहक नियमित पणे वीज देयके भरत आहेत त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एइएमएल भारतीय वीज कायदा २००३ च्या कलम ५६ (१) प्रमाणे कारवाई करण्यासाठी प्राधिकृत आहे.

या विशेष मोहिमेवर भाष्य करताना एइएमएल चे प्रवक्ते म्हणाले, “एइएमएल फक्त अशाच ग्राहकांच्या विरोधात मोहीम उघडत आहे कि ज्यांनी जून २०१९ पासून आपल्या देयकांचा भरणा केलेला नाही. या ग्राहकांना या पूर्वी अनेक वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. या ग्राहकांच्या देयके न भरण्यामुळे आमच्या इतर ग्राहकांवर बोजा पडत आहे जे नियमित पणे आपली देयके भरत आहेत. त्यामुळे आम्ही कारवाई करण्यास बाध्य आहोत. ”

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -