घरमहाराष्ट्रपुण्यात मुठा नदीचा उजवा कालवा फूटला; दांडेकर पूल परिसरात नदीचे स्वरूप

पुण्यात मुठा नदीचा उजवा कालवा फूटला; दांडेकर पूल परिसरात नदीचे स्वरूप

Subscribe

पुण्यामध्ये कालवा फुटला आहे. खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मुठा नदीचा उजवा कालवा फुटला आहे. सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुजाजवळ ही घटना घडली आहे. सव्वा अकराच्या दरम्यान कालवा फुटला असून दांडेकर पूल परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांला नदीचे स्वरूप आल्याने वाहनचालकांसह पदचा-यांची चांगलीच धावपळ झाली आहे.

- Advertisement -

 

झोपडपट्टीपणे पाणी शिरले

कालवा फुटल्याने रस्त्यावरील वाहने वाहून गेली आहेत. तर अनेक वाहने पाण्यामध्ये अडकली आहेत. या परिसरामध्ये असणाऱ्या रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. तसंच झोपडपट्टी परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलाच गोंधळ उडाला आहे. सिंहगड रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

धरणातून सोडण्यात येणारा पाणी प्रवाह थांबवला

दरम्यान, खडकवासला धरणातून कालव्यात प्रवाह थांबविण्यात आला असून जलसंपदा विभागाला माहिती देण्यात आली आहे. उपाययोजना करण्यात आल्या असून दुरुस्तीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. मात्र, कालव्याची भिंत अजूनही ढासळत असल्याने पाण्याचा मोठा लोंढा सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -