घरताज्या घडामोडीगोरेगाव येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून लहान मुलाचा मृत्यू, महिला जखमी

गोरेगाव येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून लहान मुलाचा मृत्यू, महिला जखमी

Subscribe

लहान मुल झोपेत असताना कोसळलं सिलिंगचं प्लास्टर

गोरेगावमध्ये सकाळच्या सुमारास दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. इमारतीमधील फ्लॅटमच्या सिलिंगचे सकाळी ५.२० वाजताच्या सुमारास प्लॅस्टर कोसळले यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे तर एका महिला गंभीर जखमी झाली आहे. पासाळ्यात जुन्या इमारती आणि स्लॅब पडण्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याची नोंद होत आहे. मुंबईतील अनेक भागातील इमारती मोडकळीस आल्या आहेत तरी नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. इमारतीची पडझड झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण यापुर्वीही गमवावे लागले आहेत.

गोरेगाव ( पूर्व) येथे एका इमारतीमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास फ्लॅटच्या सिलिंगचे प्लॅस्टर कोसळून झालेल्या दुघटनेत अरसलन अन्सारी (८) या लहान मुलाचा मृत्यू झाला तर फायमीदा अन्सारी (३६) ही महिला जखमी झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात शहर भागात -१, पश्चिम उपनगरात -२ ठिकाणी अशा एकूण ३ ठिकाणी इमारती, घर, घराच्या भिंती यांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. गोरेगाव (प.), राममंदिराजवळील न्यू अमन या इमारतीमधील खोली क्रमांक ७१२ मधील सिलिंगचा प्लास्टरचा भाग शुक्रवारी सकाळी ५.२० वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत २ जण जखमी झाले. या २ जखमींपैकी एक अरसलन अन्सारी (८) या लहान मुलाचा मृत्यू झाला तर फायमीदा अन्सारी (३६) या जखमी झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -