घरदेश-विदेशAlert: कोरोना रूग्णांवर Remdesivir आणि HCQ चा कोणताच परिणाम नाही; नॉर्वेच्या शास्त्रज्ञांचं...

Alert: कोरोना रूग्णांवर Remdesivir आणि HCQ चा कोणताच परिणाम नाही; नॉर्वेच्या शास्त्रज्ञांचं संशोधन

Subscribe

जगभरात कोरोनाचा कहर गेल्या वर्षभरापासून सुरू असून जगभरातील गंभीर कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारांसाठी रेमेडेसिव्हिर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाताना दिसतोय. मात्र शास्त्रज्ञांनी या दोन औषधांच्या परिणामावर कधीही एकमत दर्शविल्या बघायला मिळाले नाही. यानंतर आता नॉर्वेच्या ओस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला की, रेमेडेसिव्हिरआणि एचसीक्यू रुग्णांना बरे होण्यास किंवा रोगाची तीव्रता कमी करण्यास तसेच कोरोना मुक्त होण्यास कोणतीही मदत करत नाहीत. याचा रुग्णाच्या वयानुसार आणि रुग्णाला किती काळ लक्षणे दिसतात याचा काही संबंध नाही. यासोबतच शास्त्रज्ञांचं असंही मत आहे की, कोरोना बाधित रूग्णांवर Remdesivir आणि HCQ चा कोणताच परिणाम होत नाही.

१८१ रूग्णांवर केला अभ्यास

नॉर्वेच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेला हा दावा २८ मार्च २०२० ते ४ ऑक्टोबर २०२० या काळात २३ रुग्णालयांमधील १८१ कोरोनाबाधित रुग्णांवर संशोधन केल्यानंतर केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ४२ रुग्णांना रेमेडेसिव्हिर, ५२ रुग्णांना एचसीक्यू तर ८७ रूग्णांना कोरोनाच्या उपचारात वापरली जाणारी सामान्य औषधे देण्यात आली होती. या अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळले की कोरोना रुग्णांच्या तीनही गटांमध्ये पहिल्या आठवड्यात व्हायरलचे प्रमाण कमी होताना दिसून आले होते.

- Advertisement -

Remdesivir आणि HCQ चा कोणताच परिणाम नाही

शास्त्रज्ञांना असे आढळले की, ज्या रुग्णांना रेमेडेसिव्हिर आणि एचसीक्यू देण्यात आले त्यांच्या रूग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांवरून असे समोर आले की, यापैकी कोणत्याच औषधाने
कोरोना संसर्ग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एवढेच नाही तर या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज देखील आढळून आले नाहीत. शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात स्पष्टीकरण दिले की, रेमेडेसिव्हिर किंवा एचसीक्यूच्या मदतीने घशात असलेले विषाणू नष्ट केले जाऊ शकत नाही.


कोविडमुक्त ग्रामीण भागात आज वाजणार शाळेची घंटा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -