घरताज्या घडामोडीस्वीटूच्या 'टाईमपास' आठवणी

स्वीटूच्या ‘टाईमपास’ आठवणी

Subscribe

प्राजूची मैत्रिण चंदाची भूमिका अन्विताने साकारली होती.

फार कमी वेळात महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी स्वीटू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. येऊ कशी तशी मी नांदायला (yeu kashi tashi mi nandayla ) या मालिकेमुळे स्वीटूला प्रसिद्ध मिळाली. मात्र या मालिकेआधी स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर ( Anvita Faltankar ) ही टाईमपास (Timepass) या सिनेमात दिसली होती. प्राजूच्या जिवलग मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. अन्विताने नुकतेच टाईमपास या सिनेमातील तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. ‘टाईमपास सिनेमाचे पहिले वाचन’ असे म्हणत अन्विताने अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या सोबतचा टाईमपास सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.( actress Anvita Faltankar sweetu Share Timepass marathi Movie photos with ketaki mategaonkar)

- Advertisement -

टाईमपास हा सिनेमा प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला होता. दगडू प्राजक्ता यांच्यासोबतच प्राजूला मदत करणारी तिची मैत्रिण ‘चंदा’ म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर ही देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमाने त्यावर्षी मराठी सिनेमात सर्वाधिक कमाई केली होती. अन्विताने शेअर केलेल्या या फोटोमुळे टाईमपास या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या सिनेमात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर प्राजक्ता आणि दगडूच्या मुख्य भूमिकेत होते. तर प्राजूची मैत्रिण चंदाची भूमिका अन्विताने साकारली होती. अन्विताने शेअर केलेल्या या फोटोमुळे अनेक कलाकारांनी तिच्या फोटोवर कमेंट करत  जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


हेही वाचा – प्रेग्नंसीवरुन केलं ट्रोल, यूट्यूबर अभिनेत्री उर्मिलाने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -