घरमहाराष्ट्र'विमानतळ मुंबईतच, आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर...'; मनसेचा इशारा

‘विमानतळ मुंबईतच, आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर…’; मनसेचा इशारा

Subscribe

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाकडे गेला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी इशारा दिला आहे. आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

नितीन सरदेसाई यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे, विमानतळ मुंबईमध्येच आहे, असं म्हणत एकप्रकारे इशारा दिला आहे. “फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय …विमानतळ मुंबईमध्येच आहे…आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल,” असं ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.

- Advertisement -

नितीन सरदेसाई यांनी याआधी देखील इशारा दिला होता. “मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या,” असा शब्दांत सरदेसाई यांनी इशारा दिला.

- Advertisement -

मुंबईचं विमानतळही अदानींच्या ताब्यात

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे नेण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विविध पातळ्यांवरील न्यायिक प्रकरणांनंतर अखेर हे विमानतळ खरेदी करण्याला अदानी समूहाला हिरवा कंदीला मिळाला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -