घरटेक-वेकतुमचे PAN Card सुरक्षित आहे का? Digilocker मध्ये असे जतन करा तुमचे...

तुमचे PAN Card सुरक्षित आहे का? Digilocker मध्ये असे जतन करा तुमचे कागदपत्रे

Subscribe

देशभरात प्रवास करताना आपली वैयक्तिक कागदपत्रे महत्त्वाची असतात. मात्र प्रवास करताना ती हरवण्याचा धोका कायम आपल्याला असतो. हा धोका टाळण्यासाठी महत्त्वाची सर्व कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये जतन करता येतात. डिजीलॉकरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पॉलिसीची कागदपत्रे इत्यादी तुम्ही जपून ठेवू शकतात. यासाठी तुम्हाला एकदा डिजीलॉकर अकाऊंवर साइन अप करणं आवश्यक असते. यानंतर सर्व कागदजत्र या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवू शकतात.

यासोबतच तुम्ही आधार क्रमांकासारख्या क्लाउड स्टोरेज स्पेसवर ते सहजपणे अपलोड केले जाऊ शकतात.नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजीलॉकर काम करते. डि़जिटलायझेनमुळे कागदोपत्री कामकाज करणं यापासून सुटका मिळू शकते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅनकार्ड एकत्रिकरण सुविधेसाठी डिजीलॉकरबरोबर भागीदारी केली आहे. तुम्ही डिजिलॉकरमध्ये तुमचे पॅनकार्ड सुरक्षित ठेवू शकतात. जाणून घ्या प्रक्रिया

- Advertisement -

असं करा तुमचं PAN डिजीलॉकरमध्ये जतन

  • https://www.digilocker.gov.in/dashboard या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या
  • डिजीलॉकरवर तुमच्या नावाने अकाऊंट ओपन करून लॉगइन करा
  • यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा
  • तेथे एक पॉप-अप दिसेल, जारी केलेली कागदपत्रे थेट आपल्या डिजीलॉकरमध्ये नोंदणीकृत सरकारी विभाग आणि एजन्सींच्या संपर्कात आहेत.
  • यानंतर पार्टनर डे ड्रापडाऊनवरून आयकर विभाग पर्याय निवडा
  • पुढे असलेल्या कागदपत्रांपैकी पॅनकार्ड या कागदपत्रांची निवड करा
  • आधार डिटेलमधून नाव आणि जन्मतारीख पॅन कार्डच्या तपशीलाशी क्रॉस-चेक करा.
  • आता पॅननंबर भरून तुमचं लिंग निवडा
  • ‘कागदजत्र मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटी तुमचा पॅन डेटा डिजीलॉकरमध्ये जतन केला जाईल आणि ‘दस्तऐवज जारी केल्यानुसार’ लिंकवर प्रवेश करता येईल

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -