घरदेश-विदेशभारतातील 130 कोटी लोकसंख्ये पैकी फक्त 2 टक्के नागरिक भरतात प्राप्तीकर

भारतातील 130 कोटी लोकसंख्ये पैकी फक्त 2 टक्के नागरिक भरतात प्राप्तीकर

Subscribe

नव्या नियमाअंतर्गत 5 लाखांपर्यत उत्पन्न असणाऱ्या लोकांना प्राप्तीकरातून संपूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.

भारत हा सर्वाधीक लोकसंख्या असणारा देश आहे. भारताची लोकसंख्या तब्बल 130 कोटी असून देशात राहणारे 2 टक्के नागरिकच प्राप्तीकर भरत असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार 2018 ते 2019 या वर्षात केवळ दीड कोटी नागरिकांनी प्राप्तीकर भरला असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकच नाही तर प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या एकीकडे कमी होत चालली असून परदेशात फिरायला तसेच महागड्या गाड्या मालमत्ता खरेदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून येत आहे. पर्यटन मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2019 मध्ये 2.69 कोटी भारतीय लोकांनी परदेशवारी केली होती. तसेच देशात कोरोना महामाहरीच्या संकट काळतही 2020 मध्ये एकून 1 लाख 82 हजारांहून अधिक घरांची विक्री झाली असून तिसऱ्या तिमाहीत घरांची विक्री दुप्पट झाली होती.

प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या महसुलात 98 टक्के नागरिकांचे योगदान नसल्याचे दिसतेय. इतर विकसित देशांमध्ये 50 टक्क्याहून अधिक नागरिक प्राप्तीकर भरतात . नव्या नियमाअंतर्गत 5 लाखांपर्यत उत्पन्न असणाऱ्या लोकांना प्राप्तीकरातून संपूर्णपणे सवलत देण्यात आली आहे. तसेच शेतीतून प्राप्त होणारे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र महागड्या गाड्यांमधून फिरणारे अनेक धनाड्य शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त करणारे शेतकरी शेतीतून झालेले उत्पन्न कमी दाखवून अनेक जण प्राप्तीकर चूकवत असल्याची शंकाही सरकारने व्यक्त केली आहे. तसेच देशातील 4 टक्के धनाड्य शेतकऱ्यांना प्राप्तीकर योग्य वेळी भरला तर 25 हजार कोटींचा अतिरीक्त महसूल प्राप्त होऊ शकतो.

- Advertisement -

हे हि वाचा – ICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -