घरताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या संमतीने नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह कोकण दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करणार

पंतप्रधानांच्या संमतीने नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह कोकण दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करणार

Subscribe

आज मुख्यमंत्री आणि नारायण राणे दोघेही चिपळूण दौऱ्यावर

कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi)  यांच्या संमतीने नारायण राणे दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आणि त्यानंतर मुंबईहून विमानाने ते कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. कोकण दौऱ्यावर नारायण राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर उपस्थित आहे. नारायण राणे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आणि महाड तळीये, चिपळूण परिसराची पाहणी करणार आहेत.  (Narayan Rane will inspect flood situation on the Konkan tour with Devendra Fadnavis and pravin Darekar)  कोकणासह संपूर्ण राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हाहा:कार केला आहे. पावसामुळे कोकणपट्ट्यातील महाड, खेड,चिपळूण,राजापूर परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झालीय.

- Advertisement -

आज मुख्यमंत्री आणि नारायण राणे दोघेही चिपळूण दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाड तळीये गावातील पूरपरिस्थिती घटनास्थळीजाऊन चौकशी केली. महापूरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करुन मदतीची घोषण त्यांनी केली. मुख्यमंत्री आज चिपळूणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पाहणी करुन तेथे मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. चिपळूण येथील पूरपरिस्थिती पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्या सातारा जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

अजून बचाव कार्य सुरु

शुक्रवारी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मागच्या दोन दिवसांपासून बचाव कार्य सुरु आहे. अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे त्यामुळे मातीचा ढिग बाजूला करुन बचावकार्य करणे सुरु आहे.

- Advertisement -

पूरानंतर चिखलाचे साम्राज्य

पूराच्या पाण्यामुळे चिपळूण शहराची दयनीय अवस्था झाली आहे. पूराचे पाणी ओसरले असले तरीही चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, पाण्याच्या टँकरच्या मदतीने चिखल काढून परिसर स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका, आरोग्य संस्था कामाला लागल्या आहेत.


हेही वाचा – Taliye Landslide: तळीये दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी आणि पीडित व्यक्तींनी कथन केले भयाण अनुभव

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -