घरताज्या घडामोडीतुमचो सत्तेचा माज जनता उतरवल्या शिवाय रव्हची नाय, भास्कर जाधवांच्या अरेरावीवर भाजपची...

तुमचो सत्तेचा माज जनता उतरवल्या शिवाय रव्हची नाय, भास्कर जाधवांच्या अरेरावीवर भाजपची टीका

Subscribe

"बा भास्कर जाधवा, आज हयसर तुया जी कोकण वासीयांवर जी अरेरावी केलंस मा? त्याका सत्तेचो माज म्हणतत - भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार भास्कर जाधव यांच्या अरेरावीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर भाजपनेही कोकणी भाषेत भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण बाजारपेठेत नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन देत असताना एका महिलेचा अश्रूंचा बांध फुटतो या महिलेवर भास्कर जाधव आरेरावी करताना दिसत आहेत. तर एका महिलेवर हात उगारतानाही भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपनेही भास्कर जाधव यांच्याविरोधात संताप व्यक्त करत टीका केली आहे.

राज्यात मुसळधार पावसाने मोठा हाहाकार घातला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागात अजूनही पाऊस सक्रिय आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झाले आहे. महाडमध्ये दरड कोसळली तर चिपळूण, संगली आणि कोल्हापूर अद्यापही पाण्याखाली आहे. पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि या नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान गर्दी पांगवताना आमदार भास्कर जाधव यांची अरेरावी कॅमेऱ्यात टिपली असून सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

भाजपकडून भास्कर जाधव यांच्यावर टीका

आमदार भास्कर जाधव यांच्या अरेरावीचा भाजपनं समाचार घेतला आहे. भास्कर जाधव यांच्यावर कोकणी भाषेत टीका करण्यात आली आहे. “बा भास्कर जाधवा, आज हयसर तुया जी कोकण वासीयांवर जी अरेरावी केलंस मा? त्याका सत्तेचो माज म्हणतत, वाईच वेळ येऊ दे जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय, समजलंय मा?” अशी टीका भाजपने भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

तुझ्या आईला समजव – भास्कर जाधव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडताना पूरग्रस्त महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला होता. महिला आपल्याला मदत केल्याशिवाय जाऊ नका असे म्हणत आपली व्यथा सांगत होती. यावेळी भास्कर जाधव यांची अरेरावी दिसून आली आहे.

महिला : माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं आणि होतं नव्हते ते सगळे गेले. काही पण करा पण, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार कोकणासाठी फिरवा.

मुख्यमंत्री : हो.. हो.. करतो

भास्कर जाधव : आमदार, खासदार ५ महिन्यांचे पगार देतील.. त्याने काही होणार नाही.

महिला : तुम्ही काहीपण करा पण आम्हाला मदत करा.

भास्कर जाधव : तुझा मुलगा कुठे आहे.. आरे आईला समजव.. आईला समजव

महिला : तुम्ही काहीतरी केल तर मदत होईल, नुसती आश्वासनं देऊन जाऊ नका.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -