घरताज्या घडामोडीशहरासमोरील आव्हानांसह गरजांचे प्रतिबिंब महानगरमध्ये दिसावे - आमदार प्रशांत ठाकूर

शहरासमोरील आव्हानांसह गरजांचे प्रतिबिंब महानगरमध्ये दिसावे – आमदार प्रशांत ठाकूर

Subscribe

तब्बल ३३ वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक ‘आपलं महानगर’च्या मुंबई, नाशिक आणि ठाणे आवृत्तीनंतर रायगड आवृत्तीचे शानदार प्रकाशन शनिवारी येथे समांरभपूर्वक करण्यात आले.

विकासाचा वेग वाढत असताना शहरांसमोर नवी आव्हाने उभी ठाकत असून, गरजाही वाढत आहेत, ज्याचे प्रतिबिंब दैनिक महानगरमध्ये दिसावे, अशी अपेक्षा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
तब्बल ३३ वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक ‘आपलं महानगर’च्या मुंबई, नाशिक आणि ठाणे आवृत्तीनंतर रायगड आवृत्तीचे शानदार प्रकाशन शनिवारी येथे समांरभपूर्वक करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोच्या नेटवर्कमुळे महानगरात रूपांतर होणाऱ्या या शहराच्या निमित्ताने समाजासाठी कसे चांगले काम करता येईल यासाठी दैनिक आपलं महानगरचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही ठाकूर म्हणाले.

तर रायगड जिल्हा शिवसेनेचे सल्लागार किशोर जैन यांनी बातम्यांच्या क्षेत्रात आपलं महानगरची एक वेगळी छाप असल्याचे गौरवोद्गार काढले. राजकीय आणि इतर नेहमीच्या बातम्यांव्यतिरिक्त जनतेला माहित नसलेल्या परंतु जिव्हाळ्याच्या बातम्यांनाही आपलं महानगरने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात रायगडच्या विकासात महानगरचे योगदान महत्त्वाचे असेल, असा विश्वासही जैन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

रायगड जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप एकाच वेळी सर्व राजकीय नेत्यांना एकत्रित आणण्याची किमया आपलं महानगरने यानिमित्ताने साधल्याचे सांगतानाच आगामी काळात आपण एकत्रितपणे काम करूयात, अशी सूचना केली. राजकीय पक्षांना एकत्रितपणे काम करण्यास महानगर हे चांगले व्यासपीठ असेल, अशी अपेक्षा मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलस यांनी व्यक्त केली. कधीकाळी महानगर कार्यालयावर हल्ल्यात आपण होतो याची आठवण सांगून पोलस यांनी आज त्याच महानगरच्या रायगड आवृत्ती प्रकाशन सोहळ्यात आपण व्यासपीठावर आहोत, हा विचित्र योगायोग असल्याचे ते म्हणाले. पत्रकार प्रतिकूल परिस्थितीत काम करतात, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी काढले. महानगरने राजकीय बाणा दाखवू नये, असेही ते म्हणाले.

इंटकचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी राजकारण किंवा समाजकारण करताना पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादक केले. कोरोनाच्या काळात प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपलं महानगरने रायगड आवृत्ती काढण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. महानगरला उज्ज्वल परंपरा असल्याने या दैनिकाकडून खूप अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी औद्योगिक विकासात पुढे सरकत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या समस्या हा मोठा प्रश्न असून, त्या सोडविण्याकामी महानगरने पुढाकार घ्यावा, आपला हा लौकिक रायगडच्या समस्या दूर करण्यासाठी वापरावा, असे आवाहन केले.

- Advertisement -

तत्पूर्वी, दैनिक ‘आपलं महानगर’चे संपादक संजय सावंत यांनी आम्ही कोणत्याही विचारसरणीला बांधील नसल्याचे स्पष्ट करून हेच धोरण पुढे कायम असेल असे सांगितले. शोध पत्रकारितेचे उद्दिष्ट रायगड आवृत्तीच्या निमित्ताने ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रायगडच्या विकासात आपलं महानगरचे योगदान राहील, असा विश्वासही त्यांनी दिला. रायगड आवृत्तीचे निवासी संपादक प्रवीण पुरो यांनी प्रास्ताविकात छापील माध्यमात दमदार कामगिरी करणाऱ्या आपलं महानगरने वेब आणि पोर्टलच्या माध्यमातही दमदार पाऊल टाकल्याने एखादी महत्त्वाची बातमी काही क्षणातच जगभरातील वाचकांपर्यंत पोहचत असल्याचे सांगितले.

लॉकडाऊनमध्ये वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद पडत असताना महानगरने रायगड आवृत्ती काढून पत्रकारितेत द्रुतगती घेतली आहे. संपादकांच्या जिद्दीमुळे हे शिवधनुष्य हाती घेतल्याचे ते म्हणाले.यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय कडूूू, गणेश कोळी, के. सी. सिंग, साहिल रेळेकर, भालचंद्र जुमलेदार यांचे संपादक सावंत यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित, आपलं महानगरचे विविध ठिकठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी संपादक संजय परब, तर आभार प्रदर्शन रायगड ब्युरो चीफ उदय भिसे यांनी केले. आवृत्ती प्रकाशन सोहळा सुरू होण्यापूर्वी रायगड कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.


हेही वाचा – उभ्या राहिल्या औद्योगिक वाटा…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -