घरताज्या घडामोडीकंटेनर-क्रेनचा भीषण अपघात; स्फोटसदृश आवाजाने उड्डाणपूल हादरला

कंटेनर-क्रेनचा भीषण अपघात; स्फोटसदृश आवाजाने उड्डाणपूल हादरला

Subscribe

चार जण जखमी, या आवाजामुळे महामार्गावरुन जात असलेल्या वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीती

नाशिक शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील सहा किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावर सोमवारी (दि.२) कार घेऊन जात असलेल्या कंटेनरने १७२ फुटी क्रेन नेणार्‍या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर झालेल्या स्फोटसदृश आवाजाने उड्डाणपूलासह दीड किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. या आवाजामुळे महामार्गावरुन जात असलेल्या वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई-आग्रा महामार्गावरुन स्कॉर्पिओसह कार घेऊन कंटनेर मुंबईकडून मालेगावच्या दिशेने निघाला होता. याचवेळी पुढे क्रेन घेऊन जात असलेल्या ट्रेलरला या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे कंटेनरच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. त्यात कंटेनरमधील चौघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव वाहतूक सुरळीत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -