घरताज्या घडामोडीमाझ्या बदनामीसाठी नको ते आरोप करण्यात आले, मेहबूब शेख यांची चित्रा वाघ...

माझ्या बदनामीसाठी नको ते आरोप करण्यात आले, मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार

Subscribe

शिरुर येथे माझी बदनामी व्हावी यासाठी माझ्यावर बलात्काराचा आरोप केला.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर नको ते आरोप करण्यात आले असल्याचे मेहबूब शेख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात बीडमधील कासार पोलीस ठाण्यात तक्रिर दाखल केली आहे. मेहबूब शेख यांच्या तक्रारीवर चित्रा वाघ यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मेहबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. शेख यांच्यावर औरंगाबादमधील तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. बलात्काराच्या आरोपामुळे शेख यांच्यावर अनेक आरोप करुन त्यांची कोंडी करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलीस चौकशी देखील झाली होती. तसेच या प्रकरणातही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. मेहबूब शेख यांना अटक करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

- Advertisement -

चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीत मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे की, १८ जुलै २०२१ रोजी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी एकनाथ पवार यांच्या घरी भाजप नेत्या चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी शिरुर येथे माझी बदनामी व्हावी यासाठी माझ्यावर बलात्काराचा आरोप केला. तसेच राज्य सरकार मेहबूब शेखला अटक करत नाही असा आरोप केला आहे.

माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पोलिसांनी तपास करुन प्रकरण निकाली काढले परंतू तरिही माझी बदनामी करण्यासाठी या माझ्यावर अनेक नको नको ते आरोप करण्यात आले. चित्रा वाघ यांनी माझ्यावर आरोप केलेल्याची व्हिडिओ क्लिप्स मला काही पत्रकारांनी दाखवली होती. या व्हिडिओ क्लिप पाहून मला अधिक मनस्ताप झाला आहे. तसेच माझी समाजात बदनामी करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -