घरताज्या घडामोडीपदवीच्या प्रवेशासाठी सीईटी गरजेची नाही

पदवीच्या प्रवेशासाठी सीईटी गरजेची नाही

Subscribe

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी 5 ऑगस्टपासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरिट लिस्टनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी जिल्ह्यानिहाय कोरोनाची परिस्थिती पाहून आठ दिवसांत निर्णय घेणार असून, त्यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश बारावीच्या निकालानुसार करण्यासंदर्भात बुधवारी कुलगुरूंसोबत बैठक झाली. या बैठकीत पदवी परीक्षेसाठी सीईटीची आवश्यकता नाही, यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले. त्यानुसार पदवी प्रवेशासाठी कोणतीही सीईटी घेतली जाणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यंदा 13 लाख 962 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीपेक्षा 33 हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे प्रवेशासाठी महाविद्यालयांना तुकड्या वाढवून हव्या असतील तर त्यांनी 31 तारखेपर्यंत अर्ज करावा, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज 5 ते 14 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत. पहिली मेरिट लिस्ट 17 ऑगस्टला लागणार असून, 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर दुसरी मेरिट लिस्ट 25 ऑगस्टला जाहीर होणार असून, या लिस्टमधील विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. तिसरी मेरिट लिस्ट 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे.

सीईटी परीक्षा, संभाव्य तारखा जाहीर
26 ऑगस्टपासून एमबीए, एमसीएम, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बी एड., एल एल बी या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होतील तर इंजिनिअरिंगसाठी सीईटी दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र 14 सप्टेंबर तर दुसरे सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या तारखा संभाव्य असल्याचे सामंत यांनी सांगितले. सीईटी परीक्षा या ऑनलाईन होतील; पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -