घरताज्या घडामोडीरोह्यात सापडला दुर्मिळ उडता सोनसर्प ; उरणच्या सर्पमित्रांकडून जीवदान

रोह्यात सापडला दुर्मिळ उडता सोनसर्प ; उरणच्या सर्पमित्रांकडून जीवदान

Subscribe

दडून बसलेल्या सोन सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली.

उरणमध्ये फूट लांबीचा दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला आहे.उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या दुर्मिळ सापाला पकडून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडून दिले आहे. डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपामध्ये दुर्मिळ उडता सोनसर्प दिसला.अमोल देशमुख यांनी सपंर्क साधून उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. घराच्या छताखाली असलेल्या पाईपाच्या पोकळीत दुर्मिळ सोनसर्प दडून बसला होता. दडून बसलेल्या सोन सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली.अखेर मोठ्या प्रयासाने दुर्मिळ सोन सर्पाला पकडण्यात यश आले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या सापाला वनरक्षक तेजस नरे, पी.बी. कराडे, विकास राजपूत यांच्या उपस्थितीत कोंबर डोंगरात सुरक्षितपणे सोडून दिल्याची माहिती आनंद मढवी यांनी दिली.

उडता सोन सर्प (Ornate flying snake ) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा कोलब्रिड प्रकारातील दुर्मिळ साप आहे. क्रायसोपेलीया वंशाच्या इतर प्रजातींसह, अतिशय असामान्य आहे. कारण ते एक प्रकारचे ग्लाइडिंग फ्लाइट करण्यास सक्षम आहे. अशी माहिती सर्पमित्र आनंद मढवी यांनी दिली.

- Advertisement -

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ ऊदमांजराचा मृत्यु 

उरणमधील दादरपाडा-वडखळ दरम्यानच्या हम रस्त्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक दुर्मिळ ऊदमांजर ( asian palm civet ) मृत अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या १०.३० वाजताच्या सुमारास उरण-दादरपाडा-वडखळ दरम्यानच्या हम रस्त्यावरुन सर्पमित्र महेश भोईर उरणकडे घरी परतत होते. दरम्यान या रस्त्यावर पडलेला एक दुर्मिळ ऊदमांजर दिसला. कुतुहलापोटी भोईर यांनी जवळ जाऊन पाहणी केली.

- Advertisement -

साधारण ८ ते १० किलो वजनाचा आणि ३-४ वर्षं वयाचा असलेले दुर्मिळ ऊदमांजर मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनीही लोकेशन व मृत ऊदमांजराची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.वन कर्मचाऱ्यांनीही अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या ऊदमांजराची तपासणी, पंचनामा केली.त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दफन करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेनी दिली.


हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी सवांद साधणार.. रेल्वे आणि हॉटेल बाबत महत्वचा निर्णय

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -