घरक्राइमसराईत दुचाकी चोर गजाआड; आठ दुचाकी जप्त

सराईत दुचाकी चोर गजाआड; आठ दुचाकी जप्त

Subscribe

नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून एका सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. जाकीर ऊर्फ जक्की अख्तार शेख (वय ३९, रा.भद्रकाली, नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खासगी सुरक्षारक्षक विनोद गाजरे यांची दुचाकी ४ ऑगस्ट रोजी गाडगे महाराज पुतळ्याजवळ, मेनरोड, भद्रकाली येथून चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी विनोद गाजरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी जाकीर शेख याला व्दारका ते कन्नमवार उड्डाणपुलाखाली ट्रॅक्टर हाऊससमोरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आठ दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरीप्रकरणी वाहनमालकांनी सरकारवाडा, गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -