घरCORONA UPDATEधक्कादायक! लसीऐवजी ८६०० जणांना टोचल मिठाचं पाणी

धक्कादायक! लसीऐवजी ८६०० जणांना टोचल मिठाचं पाणी

Subscribe

ही घटना एप्रिल २०२०मध्ये घडली होती मात्र ती आता त्या घटनेचा खुलासा करण्यात आला

जगभरात लसीकरण मोहिम मोठ्या वेगात सुरू आहे. मात्र लसीत होणारी फसवणूक अजूनही सुरुचं आहे. लसीच्या नावाखाली बनावट लसी देणाऱ्या अनेक टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील बनावट लसी देण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. जर्मनीत एका नर्सने तब्बल ८,६०० नागरिकांना लसीऐवजी मिठाचे पाणी टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Nurse in Germany Instead covid vaccines 8,600 people were given salt water)  या घटनेमुळे जर्मनीतील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडालीय. ही घटना एप्रिल २०२०मध्ये घडली होती मात्र ती आता त्या घटनेचा खुलासा करण्यात आला. फायझर लसीच्या कुप्या नर्सच्या हातून खाली पडल्या त्यामुळे नर्स घाबरली आणि तिने मिठाचे पाणी भरुन त्या कुप्या लस म्हणून दिल्या.

‘या प्रकारामुळे मला मोठा धक्का बसला आहे’, अशी पोस्ट जर्मनीच्या एका स्थानिक नागरिकाने फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर तिथल्या स्थानिक अधिकांऱ्यांनी बनावट लस घेतलेल्या ८६०० नागरिकांशी संपर्क केला आणि त्यांच्या आरोग्याची चौकशी करुन त्यांना आणखी एक डोस घेण्याची विनंती केली. बनावट लस देणाऱ्या नर्सने याआधी तिच्या फेसबुक पोस्टद्वारे लसीविषयी वाईट मते पसरवली होती, असे पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिठाचे पाणी हानिकारक नसल्याचे लोकांना त्याचा कोणताही त्रास झाला नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी भारताच्या उत्तर प्रदेशमध्ये एका लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी महिलेने गप्पाच्या नादात इंजेक्शन देण्याच्या सुईत लसीची मात्र न भरताच नुसतीच सुई टोचल्याचा भयानक प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.


हेही वाचा – Marburg Virus: वटवाघुळामुळे पुन्हा जगावर संकट! १५५ जणांना मारबर्ग व्हायरसचा संसर्ग – WHO

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -