घरमनोरंजनमीराबाई चानूने घेतली दबंग स्टार सलमान खानची भेट,म्हणाली स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत...

मीराबाई चानूने घेतली दबंग स्टार सलमान खानची भेट,म्हणाली स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे

Subscribe

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला भेटल्या नंतर मीराबाई चानूच्या आनंदाला पारावरच उरला नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन करणारी 26 वर्षीय वेटलिफ्टर मीराबाई चानूचे ((Mirabai Chanu) कौतूक संपुर्ण देशात होत आहे. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. रौप्य पदक जिंकल्यावर दिल्ली तसेच मणिपूरमध्ये अगदी धूमधडाक्यात मीराबाईचे स्वागत करण्यात आले. मीराबाईचा ऑलिम्पिक मेडल पटकावण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. खडतर परिश्रम करत राज्य,राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावत मीराबाई टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धेत दाखल झाली. आणि देशाची मान अभिमानाने उंचावली. अशातच अनेक स्तरावरून मीराबाईवर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे. नुकतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर मीराबाई चानू सोबत एक फोटो शेअर केला आहे. आणि मीराबाईला शुभेच्छा देत कॅप्शन मध्ये लिहलं आहे की,’तुझ्यासाठी अत्यंत आनंदीत झालो आहोत सिल्वर मेडलिस्ट. तुला भेटून खरचं  खूप आनंद झाला, शुभेच्छा’ (Mirabai Chanu meets dabang star Salman Khan)

- Advertisement -

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला भेटल्या नंतर मीराबाई चानूच्या आनंदाला पारावरच उरला नाही. तिने देखील भेटीचा आनंद व्यक्त करत सलमानने पोस्ट केलेल्या फोटोवर कंमेट करत लिहले आहे की,’खूप खूप आभार सलमान खान सर, मी तुमची खूप मोठी चाहती आहे. आणि तुमची भेट घेणे म्हणजेच स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.’

- Advertisement -

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या मीराबाईच्या आणि सलमान खानच्या भेटीने सर्व चाहत्यामंध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाहत्यांनी देखील मीराबाईवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


हे हि वाचा – ‘C Section डिलीव्हरीवरून स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही,’ उर्मिला निंबाळकरची भावनिक पोस्ट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -