घरताज्या घडामोडीBigg Boss OTTमध्ये रेखाची एंट्री, शोमध्ये मोठी जबाबदारी

Bigg Boss OTTमध्ये रेखाची एंट्री, शोमध्ये मोठी जबाबदारी

Subscribe

नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये असणार ‘बिग बॉस’ (Bigg Boss) शो आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या (Bigg Boss OTT) रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ शोला सलमान खान (Salman Khan) नाहीतर फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) होस्ट करत आहे. या शोबाबत सातत्याने नव नवीन महिती समोर येत आहे. पण आता जी बातमी समोर आली आहे, ती ऐकून बिग बॉसच्या प्रेक्षकांना खूप आनंद होईल. यावेळेस बिग बॉस ओटीटीच्या घरात बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Actress Rekha) एंट्री करणार आहे. शोमध्ये तिची एंट्री एका खास कारणासाठी होणार, जे पाहून तुम्ही देखील आनंदी व्हाल.

पीपिंगमूनमधील वृत्तानुसार, बिग बॉसच्या मेकर्सने अभिनेत्री रेखाला एक मोठी जबाबदार देण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा शो मध्ये ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ नावाच्या एका नव्या फीचरसाठी व्हॉईस ओव्हर देणार आहे. बिग बॉसच्या प्रेक्षकांना रेखाचा आवाज ऐकणे खूप खास असणार आहे. दरम्यान बिग बॉस ओटीटीचे आता फक्त ५ आठवडे बाकी आहेत. त्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा बिग बॉस १५ होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस १५ च्या पहिल्याच दिवशी रेखा महत्त्वाची जबाबदारीत दिसेल.

- Advertisement -

‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ फॉर्मेटनुसार रेखा शोमध्ये सर्व सदस्यांना सलमान खानसोबत भेट करून देईल. तसेच रेखा शोच्या टॉप सदस्यांसोबत प्लस आणि माइनस पॉईंट हायलाईट करत त्यांच्यातले वैशिष्ट सांगेल. ‘बिग बॉस १५’ मध्ये टॉप सदस्य का बनू शकतात हे देखील सांगेल. शिवाय रेखा ‘बिग बॉस १५’च्या सीझनमध्ये एंट्री करण्यासाठी कशी जबरदस्त सदस्य आहे, हे देखील पटवून देईल. माहितीनुसार, रेखाने यापूर्वीच जुहू स्टुडिओमध्ये यासाठी डबिंग केले आहे.


हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली अन्यायकारक, अभिनेते मिलिंद दास्तांनी व्यक्त केला संताप


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -