घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यात कुपोषित बालकांची शोधमोहिम

रायगड जिल्ह्यात कुपोषित बालकांची शोधमोहिम

Subscribe

पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत मोडणार्‍या बालकांची शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना, तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत मोडणार्‍या बालकांची शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ही शोधमोहीम ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता आणि ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यात आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर योग्य उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

बालकांमधील कुपोषणाच्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाच्यावतीने गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच तीव्र आणि अतितीव्र कुपोषित श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार या मोहिमेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांचा समावेश आहे. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन करण्यासाठी ग्रामस्तरावर कार्य करणार्‍या आरोग्य आणि महिला व बालविकास विभागातील कर्मचार्‍यांची क्षमतावृद्धी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी, लसीकरण पूर्ण करण्याचेही उद्दिष्ट या पथकांना देण्यात आलेले आहे. या मोहिमेद्वारे माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात विभागाला यश येईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. या आरोग्य तपासणीमध्ये ‘सॅम’ आणि ‘मॅम’ श्रेणीत आढळणार्‍या बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात यावे, तसेच त्यांना ईडीएनएफ पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशा सूचना तपासणी करणार्‍या पथकांना देण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा – भारतात Yahoo ची न्यूज वेबसाईट झाली बंद; जाणून घ्या कारण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -