घरमनोरंजनपाणीटंचाईने बिग बी हैराण; ब्लॉगमधून झाले व्यक्त

पाणीटंचाईने बिग बी हैराण; ब्लॉगमधून झाले व्यक्त

Subscribe

बॉलिवूड विश्वातील महानायक, बिग बी अमिताभ बच्चन बऱ्याचदा आपल्या ब्लॉगमार्फत वैयक्तिक गोष्टी, कथा किंवा काही रहस्ये शेअर करतात. मात्र यावेळी बिग बी पाणीटंचाईने हैराण असल्याचे सांगितले आहे. बिग बींनी अलीकडेच एका ब्लॉगद्वारे असे म्हटले की, ते आपल्या घरी पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये असे लिहिले की, कठोर परिश्रम करण्यात आले आहेत आणि कदाचित उद्याच्या अखेरीस काही उपाय नक्की सापडेल. याचा वापर नक्की होईल मात्र तरीही बघू. आज उशीर झाला, थकवा आला आहे. म्हणूनच मी केबीसीच्या शूटिंगसाठी पूर्वीपेक्षा लवकर गेलो होतो. मी सकाळी ६ वाजेपासून उठलो आहे. फक्त घरात पाणी शोधण्यासाठी.

- Advertisement -

यासोबतच ते असेही म्हणाले की, “सिस्टम पुन्हा सुरू झाली आहे. मला कनेक्ट होण्यासाठी वेळ मिळत आहे. मग कामावर जा, वॅनिटी व्हॅनमध्ये तयार व्हा. किती त्रास. घरगुती समस्येमध्ये तुम्हाला सर्वांना सहभागी करून घेतल्याबद्दल मला खेद वाटतो. परंतु, ठीक आहे. आजचा दिवस थोडा कठीण होता.

अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात. माहितीसाठी, अमिताभ बच्चना यांनी १७ एप्रिल २००८ रोजी पहिला ब्लॉग लिहिला. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा चेहरे हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात बिग बी, इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूझा, रिया चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. बिग बींचे ब्रह्मास्त्र, अलविदा, झुंड, द इंटर्न हे चित्रपट देखील पाइपलाइनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -