घरताज्या घडामोडीकाबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात, अफगाणिस्तान सोडणारे ख्रिस डोन्हाऊ ठरले शेवटचा अमेरिकन सैनिक

काबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात, अफगाणिस्तान सोडणारे ख्रिस डोन्हाऊ ठरले शेवटचा अमेरिकन सैनिक

Subscribe

अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवण्याचा निश्चय करुन गेलेल अमेरिकी सैन्य १९ वर्ष १० महिने १० दिवसांनी मायदेशी परतले आहेत.

तब्बल २० वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकी सैन्याच्या (American soldier) महत्त्वाच्या मिशनचा अंत झाला. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) असेलेले अमेरिकी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती पेंटागॉनने दिली. अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवण्याचा निश्चय करुन गेलेल अमेरिकी सैन्य १९ वर्ष १० महिने १० दिवसांनी मायदेशी परतले आहेत. अमेरिकी सैन्य परत येताना शेवटच्या सैनिकाचा फोटो ट्विट करत अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात आले. ख्रिस डोन्हाऊ (Chris Donhau) हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे सैनिक सैनिक होते. ३० ऑगस्टला रोजी सी-१७ विमानाने ते अमेरिकेला रवाना झाले, असे त्यांनी म्हटले. (Withdrawal of US troops from Afghanistan,Chris Donhau became the last American soldier to leave Afghanistan)

- Advertisement -

काबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात येताच अमेरिकेचे राष्ट्रपती डो बायडेस म्हणाले, ‘गेल्या १७ दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरू होते. गेल्या १७ दिवसात अमेरिकेच्या सैन्याने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट मिशन पूर्ण केले आहे. सैन्याने १२०,००० नागरिकांना बाहेर काढले. अमेरिकी नागरिकांसोबतच यात इतर देशांचे नागरिकही होते, असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी ३१ ऑगस्ट पर्यतचा कालावधी निश्चित केला होता. मात्र निश्चित कालावधीच्या १ दिवस आधीच अमेरिकी सैन्य काबुलमधून माघारी फिरले. अमेरिकी सैन्यानी माघार घेताच तालिबान्यांनी रात्रभर हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला.

- Advertisement -

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपली राजकीय उपस्थिती आणि सैन्य संपवले असून आता ते कतारमध्ये हलवले आहे. अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र एंटनी ब्लिंकन यांच्या हवाल्याने म्हटले आहे.


हेही वाचा – UNSC Resolution On Afghanistan: संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तानवर ठराव मंजूर, तालिबानविषयी केली महत्त्वाची चर्चा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -