घरमनोरंजनKBC 13: हिमानी बुंदेला यांना विचारण्यात आलेला 7 कोटींचा प्रश्न कोणता होता...

KBC 13: हिमानी बुंदेला यांना विचारण्यात आलेला 7 कोटींचा प्रश्न कोणता होता माहितेय का?

Subscribe

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती'( KBC13) गेल्या अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा 13 वा सिझन सुरू झाला आहे. आणि यंदा शोच्या सुरवातीपासूनच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची जोरदार चर्चा प्रेक्षकांमध्ये तसेच सोशल मीडियावर रंगत आहे. नुकतच शोमध्ये एका महिला स्पर्धकाने सहभाग घेतला होता. हिमानी बुंदेला (himnai bundela )यांनी 7 ऑगस्टला टेलिकास्ट झालेल्या एका भागामध्ये आपल्या ज्ञानकौशल्येच्या जोरावर तब्बल 7 कोटीच्या प्रश्नाचा टप्पा गाठला होता. (himnai bundela quit kbc on 7 crore question do you know the answer)मात्र शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसल्याने हिमानी यांना स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

सध्या हिमानी यांच्या खेळाची चर्चा सगळीकडे होत आहे. खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी हिमानीचे कौतुक केलं असून ते तिच्या खेळाने प्रचंड प्रभावित झाले आहेत. हिमानी दुष्टीहीन असून या कमतरतेवर मात करत तिने आपले स्वप्न पूर्ण केलं. हिमानीला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला होता ज्याचे उत्तर तिला देता आले नाही. आपण जाणून घेऊया 7 कोटींचा तो प्रश्न काय होता. तसेच 1 कोटीचा प्रश्न ज्याचे उत्तर देऊन हिमानीने भली मोठी रक्कम जिंकली

- Advertisement -
  • सात कोटीचा प्रश्न

प्रश्न- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉ बी आर आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक काय होते ज्यासाठी त्यांना 1923 मध्ये डॉक्टरेट पदवी दिली गेली?

पर्याय

- Advertisement -

A. द वांट्स एंड मीन्स ऑफ इंडिया

B. द प्रॉब्लम ऑफ द रूपी

C. नेशनल डिविडेंड ऑफ इंडिया

D. द लॉ एंड लॉयर्स

उत्तर- ऑप्शन B म्हणजेच द प्रॉब्लम ऑफ द रूपी

  • एक कोटी साठी हिमनीला विचारण्याच आलेला प्रश्न

प्रश्न: द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी फ्रान्समध्ये ब्रिटिश गुप्तहेर म्हणून काम करताना नूर इनायत खान यांनी यापैकी कोणते छद्म शब्द वापरले होते?

पर्याय

A. वेरा एटकिंस

B. क्रिस्टीना स्कारबेक

C. जुलियन आईस्नर

D. जीन मॅरी रेनियर

आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. D जीन मैरी रेनियर याचे उत्तर देत हिमानीने 1 कोटी रुपये जिंकले


हे हि वाचा – नागार्जुनच्या बर्थडेला सून समांथा गायब, नागा चैतन्यापासून लवकरच घेणार घटस्फोट?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -