घरदेश-विदेशकतारकडून मदत मिळाल्यानंतर काबूल विमानतळ पुन्हा सुरू; यूएईचे पहिले विमान झाले लँड

कतारकडून मदत मिळाल्यानंतर काबूल विमानतळ पुन्हा सुरू; यूएईचे पहिले विमान झाले लँड

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्या नंतर अमेरिकन सैन्याची माघार झाली. या अमेरिकन सैन्याच्या माघारानंतर काबूल विमानतळ बंद करण्यात आले होते. ते आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील कतारच्या राजदूताने याला दुजोरा दिला असून कतारच्या अल जझीरा वृत्तवाहिनीने असे म्हटले की, कतारच्या राजदूताने असे सांगितले की, काबूल विमानतळ पुन्हा सुरू झाले असून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत.

अल जझीराच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राजदूत यांनी असे म्हटले की, विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. त्यामुळे काबूलपासून मजार-ए-शरीफ आणि कंधार या शहरांसाठी दोन देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. तालिबान्यांनी पूर्णपणे ताब्यात घेतल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने पहिले विमान या विमानतळावर लँड केले आहे. या मोठ्या विमानात यूएईकडून ६० टन अन्नसाठा पाठवण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या लोकांसाठी अन्न-धान्याची मदत होणं ही चांगली बातमी आहे. आम्ही युएईचे आभारी आहोत, असे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तर इस्लामिक अमीरातने सर्व देशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तानातून जाण्यापूर्वी विमानतळाच्या धावपट्टीला नुकसान पोहोचवले होते आणि सध्या त्याची दुरुस्ती केली जात असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले.

- Advertisement -

दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस स्थलांतरण ऑपरेशन संपल्यानंतर नागरिकांना तालिबानी राजवटीची भीती वाटत आहे. अफगाणिस्तान सोडू इच्छिणारे हजारो लोक तेथेच अडकून राहिले आहे. तालिबानने देश सोडू इच्छिणाऱ्यांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच महिला आणि मुलींनाही शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे आश्वासन तालिबानकडून देण्यात आले आहे.


तालिबानला करायची आहे भारताशी मैत्री; जाणून घ्या केंद्र सरकारची नेमकी भूमिका
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -