घरक्रीडाYouth Olympic Games 2018 : जेरेमी लालरिनुंगाला सुवर्ण!

Youth Olympic Games 2018 : जेरेमी लालरिनुंगाला सुवर्ण!

Subscribe

युथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

ब्यूनोस एयर्स येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. युथ ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. याआधी २०१० आणि २०१४ युथ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळवण्यात अपयश आले होते.

एकूण २७४ किलो वजन उचलत सुवर्णपदक

मिझोरमचा रहिवासी असणाऱ्या जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटात एकूण २७४ किलो (१२४ किलो + १५० किलो) वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. तुर्कीच्या तोप्तस कानेर याने एकूण २६३ किलो (१२२ किलो + १४४ किलो) वजन उचलत रौप्यपदक आणि कोलंबियाच्या विलर एस्टीव्हनने एकूण २६० किलो (११५ किलो + १४३ किलो) वजन उचलत कांस्यपदक मिळवले.

 

- Advertisement -


जेरेमीच्या नवे दोन राष्ट्रीय विक्रम

जागतिक स्तरावर चमकण्याची जेरेमी लालरिनुंगाची ही पहिली वेळ नाही. याआधी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने रौप्य (युथ) आणि कांस्य (ज्युनियर) पदके जिंकली होती. ही पदके जिंकताना त्याने दोन राष्ट्रीय विक्रमीही मोडले होते.

मीराबाई चानूकडून कौतुक 

भारताची प्रमुख वेटलिफ्टर मीराबाई चानूने जेरेमी लालरिनुंगाचे अभिनंदन केले आहे. काहीच दिवसांपूर्वी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलेली मीराबाई चानू सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र, ती युवा खेळाडूचे कौतुक
करण्यास विसरली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -