घरताज्या घडामोडीकोविड पॉलिसी चालू ठेवण्याची तारीख IRDAIने वाढवली, आता विमा कंपन्या करू शकतील...

कोविड पॉलिसी चालू ठेवण्याची तारीख IRDAIने वाढवली, आता विमा कंपन्या करू शकतील Renew

Subscribe

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा कंपन्यांना मार्च २०२२ पर्यंत अल्प कालावधीसाठी कोविड केंद्रीत आरोग्य विमा पॉलिसी विकण्याची आणि नूतनीकरणाची परवानगी दिली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रकरणादरम्यान भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने गेल्या वर्षी सर्व विमा कंपन्यांकडून आरोग्य विमाच्या स्वरुपामध्ये वेगवेगळ्या लाभासह कोरोना कवच आणि कोरोना रक्ष पॉलिसी आणण्यास सांगितले होते.

काही विमा कंपन्या अल्पकालावधीसाठी उत्पादन घेऊन आल्या होत्या, ज्या नियमित आरोग्य विमा पॉलिसींच्या तुलनेत कमी प्रीमिअमच्या कारणामुळे लोकप्रिय झाल्या. नियामकने एका परिपत्रात म्हटले आहे की, सर्व विमा कंपन्यांना २१ मार्च २०२२ पर्यंत अल्प कालावधीवाले कोविड संबंधित विमा पॉलिसी जारी करून त्याचे नुतनीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने मालमत्ता खरेदीदारांचे खोट्या कागदपत्रांपासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे लवकरच सुधारित स्वरुपात विमा पॉलिसी सादर करण्यास सांगितले आहे. नुकसान भरपाई विम्याचा एक प्रकार लाभ विमा आहे. मालमत्तेच्या संभाव्य मालकास रिअल प्रॉपर्टीच्या अनियमिततेमुळे आर्थिक नुकसानीपासून वाचवते. शिफारशीच्या आधारावर इरडाने साधारण विमा कंपन्यांकडून मालमत्ता खरेदीच्या कागदपत्रांबाबत विमा पॉलिसी आणण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – UPI पिन विसरलात! Google Pay वर पिन बदलण्याचा जाणून घ्या सोपा मार्ग

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -