घरटेक-वेकVIचा नवा विक्रम! 5G ट्रायलमध्ये 3.7 Gbps पेक्षा अधिक मिळाला स्पीड

VIचा नवा विक्रम! 5G ट्रायलमध्ये 3.7 Gbps पेक्षा अधिक मिळाला स्पीड

Subscribe

आघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेड (व्हीआयएल) महाराष्ट्रातील पुण्यात आणि गुजरातेतील गांधीनगर या शहरांमध्ये सरकारने वाटप केलेल्या ५जी स्पेक्ट्रमवर ५जी चाचण्या घेत आहे. पुणे शहरात वीने क्लाउड कोअरचे एन्ड-टू-एन्ड कॅप्टिव्ह नेटवर्क, आधुनिक ट्रान्सपोर्ट आणि रेडिओ ऍक्सेस नेटवर्कच्या लॅब सेटअपमध्ये आपल्या ५जी चाचण्या घेतल्या आहेत. या चाचणीमध्ये एमएमवेव स्पेक्ट्रम बँडवर अतिशय कमी विलंबासह ३.७ जीबीपीएसपेक्षा जास्त सर्वाधिक वेग ‘वी’ने मिळवला आहे. एनआर रेडिओज् वापरून आणि ५-जी नॉन-स्टॅन्डअलोन नेटवर्क व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक उपकरणासहित हे वेग प्राप्त केले गेले आहेत.

टेलिकम्युनिकेशन विभागाने वी ला ५जी नेटवर्क चाचण्यांसाठी पारंपरिक ३.५ गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडसह २६ गिगाहर्ट्झसारख्या एमएमवेव हाय बँड्सचे वाटप केले आहे. एमएमवेव कमी विलंबासह सर्वात कमी अंतरांवर मोठे स्पेक्ट्रम आणि क्षमता प्रदान करते.

- Advertisement -

गांधीनगर आणि पुणे शहरांत आपल्या ओईएम भागीदारांसह ‘वी’ ने ३.५ गिगाहर्ट्झ बँड ५जी चाचणी नेटवर्कमध्ये १.५ जीबीपीएसपर्यंत सर्वाधिक डाउनलोड वेग देखील प्राप्त केले आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांमधील कामगिरीबाबत वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीटीओ जगबीर सिंग यांनी सांगितले,सरकारने वाटप केलेल्या ५जी स्पेक्ट्रम बँड्सवर ५जी चाचण्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्राप्त केलेले वेग आणि विलंबविषयक निष्कर्षांबद्दल आम्ही खुश आहोत. संपूर्ण भारतभरात खूप मोठे ४जी नेटवर्क स्थापन करून सर्वात जास्त ४जी स्पीड्स आणि ५जीसाठी सुसज्ज नेटवर्क प्रदान करून आम्ही आता अत्याधुनिक ५जी तंत्रज्ञानाचे परीक्षण करत आहोत, जेणेकरून भविष्यात भारतातील उद्योगव्यवसायांना आणि ग्राहकांना खऱ्या अर्थाने डिजिटल अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही सक्षम बनू.’

- Advertisement -

५जी नेटवर्कच्या उच्च वेग आणि कमी विलंब या वैशिष्ट्यांमुळे सुधारित सर्व्हेलन्स आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग/ब्रॉडकास्ट; सुधारित ऑनलाईन गेमिंग अनुभवासाठी एआर/व्हीआर अशा अनेक क्षमतांचा लाभ मिळतो आणि यामुळे ५जी स्मार्ट फॅक्टरीचा विकास देखील सक्षम होईल. इंडस्ट्री ४.० आणि ५जी स्मार्ट सिटी ५जी तैनात करण्यात मदत करेल व देशात तंत्रज्ञान सुधारणांचे नवे आशादायी युग घेऊन येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -