घरताज्या घडामोडीतब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर विषारी नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश

तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर विषारी नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश

Subscribe

बोराडे कुटूंब दहा दिवसांपासून भयभीत अवस्थेत होते.

कर्जत तालुक्यातील एकसल येथील प्रथमेश बोराडे यांच्या घरात सलग दहा दिवस वास्तव्य करून असलेल्या विषारी सापाला पकडण्यात अखेर सर्प मित्राला यश आले. गेल्या दहा दिवसांपासून भिंत आणि पत्र्याच्या सेड यामधील अडचणीच्या ठिकाणी एकाच ठिकाणी असल्याने बोराडे कुटूंब दहा दिवसांपासून भयभीत अवस्थेत होते. सर्पमित्र ऋषी शिंदे याने अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नागाला पकडण्यात यश मिळवले.

कर्जत येथील एकसल गावातील रहिवासी असलेले प्रदिप बोराडे व पत्नी कविता बोराडे हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह एकसलमध्ये दोन वर्षापूर्वी नव्याने बांधलेल्या घरात राहतात. गेल्या दहा दिवसापूर्वी पत्नी कविता हिला आपल्या घराच्या छपराखालच्या कपारीत साप असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर चार दिवस तिथे काहीच दिसले नाही. पाचव्या दिवशी पुन्हा तिचं परीस्थिती त्यानंतर मात्र, कविता हिने घरातील सर्व सदस्यांना या घटनेबद्दल सांगितले. मात्र तो हुलकावणी देत असल्याने बोराडे कुटुंबाचा जीव संकटात होता. अशा परीस्थितीत सारे कुटुंब याच घरात राहत होते. दहाव्या दिवशी हा साप पुन्हा बाहेर आला सर्वांची चांगलीच दमछाक झाली. भिंतीच्या अडचणीच्या ठिकाणहून तो बाहेर येत नव्हता. यामुळे सगळेच भियभित झाले होते.

- Advertisement -

सर्पमित्र ऋषी शिंदे याला पाचारण करण्यात आले. तथापि सर्प अगदीच अडगळीत असल्याचे लक्षात आल्यावर भींत फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्प पकडण्यासाठी सुमारे अडीच तासांचा अवधी लोटला. अथक प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात सर्प मित्राला यश आले. पकडलेल्या सापाला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.


हे ही वाचा – सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांचा आता एककलमी कार्यक्रम, मुंबै बॅंक चौकशीवर दरेकर आक्रमक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -