घरट्रेंडिंगतुमच्याकडे १ रुपयाची 'ही' नोट असेल, तर तुम्ही कमवू शकता ७ लाख...

तुमच्याकडे १ रुपयाची ‘ही’ नोट असेल, तर तुम्ही कमवू शकता ७ लाख रुपये! वाचा सविस्तर

Subscribe

बऱ्याच जणांना जुन्या नोटा किंवा नाणी जमा करण्याचा छंद असतो. यासह जुन्या नाण्यांची आणि नोटांची आजकाल मागणी देखील वाढली आहे. त्यांच्या मागणीचे कारण म्हणजे त्यांना पुन्हा चलनात यायचे नाही तर काही लोक त्याच्या संकलनाचे शौकीन आहेत. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये दुर्मिळ नाणी आणि नोटा लोकांना चांगली किंमत देत आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर उत्पन्न कमावू शकणार आहात. एवढेच नाही तर तुम्ही कमी वेळात करोडपतीही बनू शकतात.

२६ वर्षांपूर्वी भारत सरकारने एक रुपयाची अशी नोट बंद केली होती, पण त्याची छपाई जानेवारी २०१५ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आणि ती चलनात देखील आली. मात्र आता ही एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला एक दोन नाही तर पूर्ण ७ लाख रुपये मिळवून देऊ शकते. तुमच्याकडेही आहे अशी नोट? तर ती तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर विकून करोडपतीही होऊ शकता. ठराविक नाणी आणि नोटा ऑनलाईन वेबसाईटवर विकल्या जातात. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या खास १ रुपयाची नोट विकून ७ लाख रुपये कमवू शकणार आहात.

- Advertisement -

ज्या एका रुपयाच्या नोटने तुम्हाला पूर्ण सात लाख रुपये कमवण्याची संधी मिळू शकते. यासंदर्भात काही अटी आहेत किंवा तुम्ही ती नोट कशी ओळखाल…जाणून घ्या ही नोट स्वातंत्र्यापूर्वीची एकमेव नोट आहे, ज्यावर तत्कालीन राज्यपाल जेडब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. ही ८० वर्षांची नोट असून ती १९३५ मध्ये ब्रिटिश भारताने जारी केली होती. Ebay वेबसाइटवर या नोटची किंमत सात लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. परंतु हे आवश्यक नाही की Ebayवरील प्रत्येक नोट इतकी महाग आहे, काही नोटा आहेत ज्या कमी किमतीत देखील उपलब्ध आहेत. त्यापैकी १९६६ ची एक रुपयाची नोट देखील ४५ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे १९५७ ची नोट ५७ रुपयांना उपलब्ध आहे. तुमच्याकडे असेल अशी जुनी नोट तर अशा वेबसाईटवर नक्की भेट द्या


महिला अत्याचारात मुंबईची दिल्लीकडे वाटचाल, ८ महिन्यात ६१९ बलात्कार तर ७२३ अपहरण

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -