घरताज्या घडामोडीAir India disinvestment: एअर इंडियाची निविदा टाटा सन्सने जिंकल्याची बातमी चुकीची -...

Air India disinvestment: एअर इंडियाची निविदा टाटा सन्सने जिंकल्याची बातमी चुकीची – केंद्र सरकार

Subscribe

एअर इंडिया टेकओव्हरची निविदा ही टाटा सन्सने मिळवल्याची बातमी ब्लूमबर्ग या पोर्टलने प्रकाशित केली होती. पण ही बातमी चुकीची असल्याची माहिती केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे. सरकारने निविदा प्रक्रियेअंतर्गत टाटा सन्सला या निविदा प्रक्रियेत विजयी घोषित केल्याची माहिती ब्लूमबर्गने दिली होती. केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट एण्ड पब्लिक इंटरेस्ट मॅनेजमेंटने एअर इंडियाची निविदा टाटा सन्सने जिंकल्याबाबतची बातमी खोटी असल्याची माहिती स्पष्ट केली.

- Advertisement -

केंद्र सरकारने माध्यमांच्या बातम्यांचा दाखला देत टाटा ग्रुपने एअर इंडियाशी संबंधित आर्थिक निविदा प्रक्रियेची कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले. याबाबतचा निर्णय जेव्हा होईल, त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे माध्यमांकडून प्रसारित होणारे वृत्त खोटे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जेव्हा याबाबतचा निर्णय घेण्यात येईल तेव्हा सरकारकडून हा निर्णय सांगण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एअऱ इंडियाच्या टेकओव्हरमध्ये टाटा ग्रुप आणि स्पाईस जेटचे चेअरमन अजय सिंह चौधरी हे मुख्य दावेदार म्हणून ओळखले जात आहेत. भारत सरकारने डिसेंबर २०२० पासून स्वारस्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला चार जणांनी प्रतिसाद दिला. पण त्यापैकी केवळ दोन जणांनीच अंतिम प्रक्रियेपर्यंत जाण्याची औपचारिकता पुर्ण केली.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून तोट्यातील एअर इंडिया कंपनी विकण्याचा होणारा हा दुसरा प्रयत्न आहे. याआधीही केंद्र सरकारने मार्च २०१८ मध्ये असाच एक प्रयत्न केला होता. त्यावेळी ७६ टक्के हिस्सा विकण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पण तेव्हाही या प्रक्रियेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

सरकारचा दररोज २० कोटी रूपये इतका तोटा एअऱ इंडिया सुरू ठेवण्यासाठी होत आहे. एअर इंडियाला आतापर्यंत ७० हजार कोटींचा तोटा झाला आहे. एअर इंडियाची मालकी हस्तांतरीत करण्यासाठीची निविदा प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. पण या निविदा प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद सुरूवातीच्या टप्प्यात आला नव्हता. कोरोना काळातही या निविदा प्रक्रियेचा कालावधी सातत्याने वाढवण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार एअऱ इंडियाने आरक्षित ठेवलेली बोली प्रक्रियेतील किंमत ही १५ हजार ते २० हजार कोटीच्या घरात होती. १९३२ साली स्थापन झालेल्या एअऱ इंडियाचे आधीचे नाव हे टाटा एअरलाईन्स होते. भारतातील पहिले परवानाधारक पायलट असलेले जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर १९४७ साली या कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले. एअर इंडिया टेकओव्हर करण्यासाठी टाटा सन्सने खूपच उत्सुकता दाखवली असल्याची माहिती आहे. टाटाने आतापर्यंत प्रिमिअर अशी विस्तराची सेवा सिंगापूर एअरलाईन्ससोबत संयुक्तिकपणे दिलेली आहे.

जानेवारी २०२० मध्येच या कंपनीच्या हिश्शेदारीच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात झाली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे या संपुर्ण प्रक्रियेत दिरंगाई झाली. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने वित्तीय निविदा प्रक्रियेचा टप्पा सुरू केला. टाटा ग्रुपने डिसेंबर २०२० मध्येही महाराजा ग्रुप टेकओव्हर करण्याच्या प्रयत्नात होती.

एअऱ इंडिया सातत्याने म्हणजे २००७ पासून तोट्यात आहे. या निविदा प्रक्रियेत टाटा विजयी ठरल्याने आता टाटाकजे ४४०० डोमेस्टिक आणि १८०० इंटरनॅशनल लॅंडिंग तसेच पार्किंट स्लॉट्सचा ताबा येणार आहे. त्यामध्ये डोमेस्टिक तसेच ९०० परदेशी स्लॉट्सचाही ताबा असेल.


हेही वाचा – Tata sons win air india bid : एअर इंडियासाठीची बोली टाटा सन्सने जिंकली

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -