घरताज्या घडामोडीधाड टाकून सनसनाटी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, आयकर विभाग धाडसत्रावर जयंत पाटलांची...

धाड टाकून सनसनाटी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, आयकर विभाग धाडसत्रावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

भाजपचे पुढारी महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे घेऊन बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एकाच वेळी ५ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ही छापेमारी केवळ नेत्यांना बदनाम करण्यासाठी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना बदना करण्याचे भाजपचे षडयंत्र असून भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा विचार करण्याचा भाग असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एनसीबी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे की, या यंत्रणा भाजपच चालवत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधता राज्यातील आयकर विभागाच्या छापेमारीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की आयकर विभागाची कारवाई उत्तर प्रदेशमधील लखीमपुर घटेवरुन लक्ष हटवण्यासाठी करण्यात येत आहे. सीआरपीएफच्या सुरक्षेत चार कारखान्यांच्या संचालकांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. भाजपचे पुढारी महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे घेऊन बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत. भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा विचार करण्यासारखा भाग आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना त्रास देण्यात आला परंतु न्यायालयाने त्यांना न्याय दिला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सर्व नेते निर्दोष असताना धाडसत्र करुन बदनाम करणं हा भाजपचा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

अजित पवार कधीच काही लपवत नाहीत

आयकर विभागाने छापेमारी केली आहे. त्यांना माहिती हवी होती तर त्यांनी मागितल्यावर मिळाली असती. परंतु एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा प्रययत्न आहे.
अजित पवारांनी कशाची कागदपत्रे कधीच लपवली नाही. अजित पवार कधीच लपवत नाही. लखीमपुर घटनेवर राज्याच्या वतीने खेद व्यक्त केला आहे.

यंत्रणा भाजप चालवतंय

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपचे कार्यकर्ते पुढे झटून होते याचा अर्थ या देशातील सर्व यंत्रणा भाजप चालवत आहे. सरकार चालवत नाही. त्यामुळे विरोधकांना नामोहरण करणे बदनाम करणे हाच उद्देश असून जास्त काही उद्देश आहे असं वाटत नाही असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. लखीमपुरला घडलेल्या घटनेवर मंत्रिमंडळाने खेद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने बंद पुकारला आहे त्यामुळे भाजपने संतापून ही कारवाई केली आहे. शेतकरी पेटून उठला आहे. यामुळे असे काही कृत्य करुन लक्ष विचलित करण्याचे काम भाजप करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘कोरोनाचं सावट कायमचं जाऊ दे’: मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -