घरताज्या घडामोडी..तर मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गला म्हावऱ्यांचा पाहुणचार, राणेंचं आमंत्रण

..तर मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गला म्हावऱ्यांचा पाहुणचार, राणेंचं आमंत्रण

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आम्ही केल्या, त्या गोष्टी आम्हीच सांगणार. आमच्या मुलाच नाव आम्हीच ठेवणार, नाही तर काय दुसरी व्यक्ती ठेवणार असेही नारायण राणे म्हणाले. तुम्ही ही गोष्ट भाजपने केली म्हणून कबुल करा, असाही टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. तुम्ही या आणि उद्घाटन करा, तुम्हाला मान पण देतो, पण हे आम्ही केले हे मान्य करा. माझ आणि उद्धव ठाकरेंचे वैर नाही. पण आम्ही केले म्हणून जे मिरवताहेत त्यासाठी आमचा आक्षेप आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे येऊदेत त्यांचे स्वागत आहे, असेही नारायण राणे म्हणाले. वाटल्यास पाहुणचार करू असेही राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातल्या म्हावऱ्याचा पाहुणचार

माझ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैर नाही. पण उद्धव ठाकरेंच्या भोवती लोक आहेत ते चिपीच्या विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच शिवसेनेने उद्घाटनाला यावे आणि उद्घाटन करावे, पण भाजपने हे विमानतळ केले ही बाब मान्य करावी. उद्धव ठाकरेंचा वाटल्यास म्हावऱ्यांनी पाहुणचार करू असेही राणे म्हणाले. मालवणातील खास पाहुणचार त्यांच्यासाठी करू असे राणे म्हणाले. सिंधुदुर्गात मालवणचे म्हावरे म्हणजे मासे खायला घालू असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी भाजप नेते विनोद तावडे यांनी नवरात्री सुरू असल्याची आठवण करून दिली. पण उद्धव ठाकरे हे मालवणी जेवण गपचूप खातात ही गोष्ट यावेळी सांगितली.

- Advertisement -

हेही वाचा : चिपी उद्घाटनाला पाहुणे म्हणून येताय… श्रेयावरून राणेंचा ठाकरे सरकारला टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -