घरताज्या घडामोडीCorona fake report : वकील अश्विनी थवई मृत्यूप्रकरण ; मृताच्या बनावट कोरोना...

Corona fake report : वकील अश्विनी थवई मृत्यूप्रकरण ; मृताच्या बनावट कोरोना अहवालाबाबत पनवेल ,वाशीतील ६ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Subscribe

खोटा अहवाल बनवणे पडले महागात...

महिला वकील अश्विनी थवई मृत्यूप्रकरणी पनवेल आणि वाशीतील सहा डॉक्टरांवर कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अश्विनी थवई यांचा मृत्यू झाला होता. यावेळी अश्विनी या कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत पनवेलमधील गांधी रुग्णालयाने त्यांना यूडीसी सॅटलाईट लॅबोरॅटरीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनी यांना जास्त प्रमाणात भूल दिल्याने तसेच शस्त्रक्रिये दरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने अश्विनी यांचा मृत्यू पटेल रुग्णालयात झाल्याचे आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केले.वकील अश्विनी थवई यांच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल कोर्टाने दिले आहेत. पटेल रुग्णालयासह,गांधी रुग्णालय तसेच कोरोना रुग्ण असल्याचा खोटा अहवाल देणारे डॉक्टर अश्या एकूण सहा जणांवर निष्काळजीपणासह, बनावटगिरी करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

गेल्या वर्षी महिला वकील अश्विनी थवई पनवेलमधील पटेल रुग्णालयाल उपचारासाठी गेल्या होत्या.उपचारादरम्यान थवई यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर रुग्णालयाच्या डॉ. कृतिका पटेल यांनी त्यांना तातडीने कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज असल्याने पनवेलमधील गांधी रुग्णालयात हलविण्यात आले असून, या दरम्यान २४ तासांनंतर अश्विनी यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन टाळण्यासाठी मृत अश्विनी या करोनाबाधित असल्याचा अहवाल वाशी येथील एका प्रयोगशाळेने दिला. त्यानंतर याच प्रयोगशाळेसह इतर तीन प्रयोगशाळांनी मृत अश्विनी यांना करोना झाला नसल्याचा अहवाल दिला. याबाबत मृत अश्विनीचे पती निशांत थवई यांनी पवनेल शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणात काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे निशांत थवई यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. पनवेल वकील संघटना आणि थवई कुटुंबीयांनी याबाबत पनवेलच्या न्यायालयात दाद मागितली होती. अखेर गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या न्यायालयीन लढय़ाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. यात पनवेलच्या न्यायालयाने संबंधित प्रयोगशाळेचे मालक, पटेल व गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर मृत्यूस कारणीभूत ठरणे, फसवणूक करणे, कट रचणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

हे ही वाचा – वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावली; चार तासांत चोरट्यास अटक


 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -