घरताज्या घडामोडीAryan Khan Drugs Case: आर्यनने मला त्याच्या आई वडिलांना फोन करायला सांगितला...

Aryan Khan Drugs Case: आर्यनने मला त्याच्या आई वडिलांना फोन करायला सांगितला होता, किरण गोसावीचा खुलासा

Subscribe

आर्यन खानकडे त्याचा फोन नव्हता त्यामुळे त्याने मला माझ्या फोनवरुन शाहरुखच्या मॅनेजरला फोन करायला सांगितला. त्यानंतर आर्यनने मला त्याच्या आई वडिलांशी फोनवर बोलणे करुन दे अशी रिक्वेस्ट केली होती.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात फरार असलेला एनसीबीचा फरार पंच किरण गोसावी संदर्भात अनेक खुलासे समोर येत आहेत. किरण गोसावीने आर्यन खानसोबत घेतलेल्या सेल्फीमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी आर्यने आपल्या आई वडिलांशी फोनवर बोलणे करुन दे असे सांगितले असल्याचा खुलासा किरण गोसावीने आजतकशी बोलताना केला आहे. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरण गोसावी संदर्भात अनेक खुलासे करत आर्यन खान प्रकरणात २५ करोडचे डिल झाले होते त्यातील ८ करोड रुपये समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा मोठा खुलासा केला. त्याचप्रमाणे किरण गोसावी यांच्या सांगण्यावरुन प्रभाकर यांनी ५० लाख रुपये सॅम डिसोझा यांना दिल्याचा दावा देखील प्रभाकर यांनी केला.

किरण गोसावीने पुढे असे म्हटले की, ६ ऑक्टोबरपर्यंत मी मुंबईत होतो. मला जबरदस्तीने फोन बंद करावा लागला कारण मला अनेक धमक्यांचे फोन येत होते. मी समीर वानखेडेला ओळखत नाही मी त्यांना फक्त टिव्हीवर पाहिले आहे. मी सर्व गोष्टी वाचून पंचनाम्यावर सह्या केल्या होत्या. आर्यन खानकडे त्याचा फोन नव्हता त्यामुळे त्याने मला माझ्या फोनवरुन शाहरुखच्या मॅनेजरला फोन करायला सांगितला. त्यानंतर आर्यनने मला त्याच्या आई वडिलांशी फोनवर बोलणे करुन दे अशी रिक्वेस्ट केली होती.

- Advertisement -

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केलेले सर्व आरोप किरण गोसावी यांनी फेटाळले आहेत. मी प्रभाकर साईलला ओळखतो. त्याने माझ्याकडे काम केले होते मात्र त्याने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ११ ऑक्टोबरनंतर मी प्रभाकरच्या संपर्कात नाही,असे किरण गोसावीने म्हटले आहे.

किरण गोसावी विरोधात मुंबई तसेच पुण्यात अनेक फसवणूकीच्या तक्रारी दाखल आहेत. तसेच किरण गोसावी हा वॉन्टेट असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर किरण गोसावी फरार झाला होता. माझ्या जिवाला धोका आहे. जेलमध्ये मला मारुन टाकण्यात येईल अशा धमक्या मला येत आहेत. तुम्हीच ठरवा मी सुरक्षित आहे की नाही?,असे किरण गोसावीने आजतकशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Khan Drugs case: किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -