घरदेश-विदेशTraffic Rules: मुलांना मागे बसवून बाईक चालवण्यासाठी नवे नियम, स्पीड ४० पेक्षा...

Traffic Rules: मुलांना मागे बसवून बाईक चालवण्यासाठी नवे नियम, स्पीड ४० पेक्षा जास्त असल्यास…

Subscribe

बाईकवरुन लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या रस्ते अपघातात लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नियम महत्त्वपूर्ण असणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी ४ वर्षाखालील मुलांना बाईकवर मागे बसवून बाईक चालवणाऱ्यांसाठी कोणतीही वेगमर्यादा नव्हती. मात्र नवे नियम अंमलात येताच लहान मुलांना घेऊन बाईकवरून प्रवास करताना वेगमर्यादा लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, लहान मुलांना बाईकवरून नेताना ४० पेक्षा जास्त वेगाने बाईक चालवण्यास कायद्याचा उल्लंघन मानला जाईल.

तसेच दुपारच्या सुमारास ९ ते ४ वयोगटातील लहान मुलाला घेऊन बाईक प्रवास करत असताना त्या मुलाला क्रॅश हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय ते मुलं एकटं किंवा इतर व्यक्तीसोबत चालकाच्या मागच्या सीटवर बसून प्रवास करत असतानाही त्याच्या डोक्यावर आणि चेहरा कवर होईल असं हेल्मेट असणं बंधनकारक आहे.

- Advertisement -

केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील बदल करण्यासाठीच मसुद्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार आता लहान मुलांना मागे बाईकवर मागे बसून प्रवास करताना मागे बसलेल्या बालकाला सेफ्टी हार्नेसने स्वत:ला बांधून घ्यावे लागणार आहे.

ही सेफ्टी हार्नेस एक एडजस्टेबल वेस्टप्रमाणे असेल. ज्यामुळे बाईक प्रवासादरम्यान मुलं एका स्ट्रॅपमुळे चिटकून राहिल. लहान मुलांसाठीचे सेफ्टी किट्स वजनाने हलकी, अॅडजेस्टेबल, टीकाऊ आणि पाण्यामुळे परिणाम होणारी नसावीत.

- Advertisement -

वाहन क्षेत्रातील विविध तज्ज्ञांशी चर्चा करु या नियमांसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या नियमाची अमंलबजावणी करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -