घरताज्या घडामोडीamravati violence: राज्य सरकारने कारवाई करावी अन्यथा प्रकरण हाताबाहेर जाईल, दरेकरांचा इशारा

amravati violence: राज्य सरकारने कारवाई करावी अन्यथा प्रकरण हाताबाहेर जाईल, दरेकरांचा इशारा

Subscribe

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये दंगल उफाळली आहे. अमरावतीमध्ये मोर्चे काढण्यात आले असून हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचा महाराष्ट्रात उद्रेक होता कामा नये असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच या दंगलीवर महाराष्ट्र सरकारने नियंत्रण मिळवावे आणि योग्य ती करावी करण्यात यावी अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे अमरावतीमधील दंगलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जर कारवाई केली नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे. दरेकर म्हणाले की, मला वाटतं त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर अशा प्रकारचा उद्रेक इथे होता कामा नये. इथे दंगल करत असाल तर महाराष्ट्र सरकारने तात्काळ कारवाई करावी कारण अशा प्रकारचे जातीय तणाव निर्माण होणार असेल तर, तो महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग आशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते आणि इथे दादागिरी कराल तर महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारने यावर कारवाई करावी अन्यथा हाताबाहेर प्रकरण जाईल असे दरेकर म्हणाले.

- Advertisement -

त्रिपुरामध्ये घटना घडलीच नाही

त्रिपुरामध्ये मशीद जाळली असल्यामुळे महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात दंगल करण्यात आली. परंतु त्रिपुरामध्ये तशी घटना घडलीच नाही अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्रिपुरामध्ये घटना घडल्याची ज्यांनी माहिती आणि फोटो समाज माध्यमांवर टाकले त्यांच्याविरोधात त्रिपुरा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हिंसा घडवणे हे सुनियोजीत षडयंत्र असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


हेही वाचा :  अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न, विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा – वळसे-पाटील

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -