घरताज्या घडामोडीविचित्र सिंड्रोममुळे महिलेने ३० वर्षे केले आजाराचे नाटक! काय आहे नेमका सिंड्रोम?

विचित्र सिंड्रोममुळे महिलेने ३० वर्षे केले आजाराचे नाटक! काय आहे नेमका सिंड्रोम?

Subscribe

जगभरात अनेक विचित्र आजार (Weird Diseases) आहेत, ज्याबद्दल ऐकल्यानंतर थक्क व्हायला होते. अशाप्रकारचे सिंड्रोम देखील असतात. हे सिंड्रोमसुद्धा विचित्र (Weird Syndromes) असतात. त्यांची लक्षणे ऐकून कोणीही आश्चर्यचकीत होऊ शकतात. नुकतेच इंग्लंमधील एका महिलेल्या झालेल्या विचित्र सिंड्रोमबद्दलचा (England Woman Strange Syndrome) खुलासा झाला आहे. या सिंड्रोमबाबत जेव्हा महिलेच्या मुलीला समजले तर ती हैराणच झाली.

नॉटिंघमची राहणारी हेलेन नेलरची (Helen Naylor) आई एलिनॉरचा (Elinor) अलीकडेच मृत्यू झाला. ज्यामुळे हेलेन खूप दुःखी झाली आहे. पण आईच्या मृत्यूनंतर जेव्हा हेलेनने तिची वैयक्तिक डायरी वाचली तेव्हा तिच्या आईला असलेल्या विचित्र सिंड्रोमबद्दल वाचून ती हैराण झाली होती. हेलेनच्या आईने तिला संपूर्ण आयुष्य सांधेदुखी आणि खूप थकवा (Mother Faked Illness) असल्याचे सांगितले होते. पण आईच्या वैयक्तिक डायरीमधील सत्य वाचून हेलेनच्या पाया खालची जमीन सरकली.

- Advertisement -

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, हेलेनची आई एलिनॉरला एक विचित्र प्रकारचा सिंड्रोम होता. ज्याचे नाव मुनचॉसेन्स सिंड्रोम (Munchausen’s syndrome) असे आहे. जे लोकं या सिंड्रोमने ग्रस्त असतात ते लोकं आजारपणाचे नाटक करतात. त्यांना दुसऱ्यांकडून सेवा करून घेणे आणि सहानभुती घेणे खूप चांगले वाटत असते. हेलेनने सांगितले की, तिच्या आईने ३० वर्षांपर्यंत तिला खोटं सांगितलं होत, तिची तब्येत नेहमी चांगली नसायची.

३८ वर्षीय हेलेनने पुढे सांगितले की, खूप लहान वयापासून तिला तिच्या आईची काळजी घ्यावी लागली होती. कारण ती खूप आजारी असायची. ती कधी कुटुंबासोबत फिरायला गेली नाही. एवढेच नाहीतर कधी बाहेर स्वतः फिरायला गेली नाही. पण जेव्हा ती शाळेत जात होती तेव्हा तिची आई आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायची. तिच्या आईने तिला सांगितले होते की, तिचे वडील खूप आजारी आहेत आणि ते लवकरच मरणार आहेत. हेलेनच्या आईने डायरीमध्ये लिहिले आहे की, आजारसंबंधित खोटं बोलून तिला खूप मज्जा यायची आणि ती खूप खुश असायची.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -