घरताज्या घडामोडीOmicron Image : ओमिक्रॉनचा पहिला फोटो जगासमोर, डेल्टापेक्षाही अधिक म्युटेशन्स

Omicron Image : ओमिक्रॉनचा पहिला फोटो जगासमोर, डेल्टापेक्षाही अधिक म्युटेशन्स

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्याने सापडलेला व्हेरीएंट ओमिक्रॉनमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स असल्याचे बोलले जात होते. पण ओमिक्रॉनचा पहिला वहिला असा फोटो समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या नव्या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटंट आढळल्याची या फोटोतून समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे डेल्टा व्हेरीयंटपेक्षाही मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्याचे आढळले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचा पहिला फोटो रोमच्या नामांकित बॅम्बिनो गेसु हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ओमिक्रॉनची थ्री डी इमेज या निमित्ताने मांडण्यात आली आहे. या फोटोमध्ये ओमिक्रॉनचा आकारही स्पष्ट झाला आहे.

कसा आहे ओमिक्रॉनचा आकार ?

ओमिक्रॉनचा फोटो हा थ्री डायमेन्शनल असून एखाद्या नकाशासारखा या व्हेरीयंटचा आकार आहे. महत्वाचे म्हणजे डेल्यापेक्षा या ओमिक्रॉन व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटशेन्स आहेत. त्यामध्ये प्रोटिनच्या माध्यमातून ह्युमन सेल्सवर परिणाम करणारे सगळेच प्रोटिन्स एकाच ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत. डेल्टाच्या फोटोच्या तुलनेत हे म्युटेशन अधिक असल्याचे दिसत आहेत. याचा अर्थ असा होत नाही की हे व्हेरीयंट अधिक धोकादायक आहेत. पण व्हायरसने आणखी वेगळे रूप धारण केल्याचे यामध्ये स्पष्ट होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कारण ह्या व्हायरसने मानवांच्या माध्यमातून आणखी व्हेरीयंट तयार केल्याचे अडॅप्टेशनच्या प्रक्रियेतून सिद्ध होते. इतर अभ्यासातही असे दिसून आले आहे की, ही अडॅप्टेशनची प्रक्रिया न्यूट्रल असते. अनेकदा ही कमी धोकादायक असते किंवा अधिक धोकादायकही असते.

- Advertisement -

संशोधकांनी या फोटोमध्ये अभ्यास करताना प्रामुख्याने म्युटेशनचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चरच्या माध्यमातून स्पाईक प्रोटीनचा अभ्यास करण्याचे संशोधकांचे उदिष्ट होते, अशी माहिती मिलेन विद्यापिठाच्या क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापिका क्लाऊडिया अल्टेरी यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि हॉंग कॉंग येथून उपलब्ध झालेल्या व्हेरीयंटच्या माध्यमातून वैज्ञानिकांच्या टीमने हा फोटो मिळवला आहे. या फोटोमध्ये एखाद्या नकाशासारखे व्हेरीएशन दिसून आले आहे. प्रामुख्याने म्युटेशनही दिसून आले आहे.

या फोटोच्या उपलब्धततेमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की या म्युटेशनचा परिणाम हा व्हायरसच्या संसर्गावर किंवा लशीच्या परिणामकतेवर किती होणार हे संशोधकांना अभ्यासण्याची संधी नजीकच्या काळात मिळणार आहे. त्यामुळेच व्हायरसची भीषणता या फोटोच्या अभ्यासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार हे नक्की. या व्हेरीएंटच्या प्रयोगशाळेतील उपलब्धततेमुळे आगामी काळात ओमिक्रॉनच्या संसर्गाचा आढावा घेणेही शक्य होईल.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -