घरताज्या घडामोडीमास्कबाबात जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी वापरला रणवीरच्या '83' मधला डायलॉग, पोस्ट तुफान व्हायरल

मास्कबाबात जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी वापरला रणवीरच्या ’83’ मधला डायलॉग, पोस्ट तुफान व्हायरल

Subscribe

मुंबई पोलिसांची जगजागृती करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

मुंबई पोलीस नेहमीच त्यांच्या अनोख्या हटके स्टाइलने सोशल मीडियावर जनजागृती करणाऱ्या पोस्ट करत असतात. मुंबई पोलिसांनी आजवर त्यांच्या अनेक क्रिएटिव्ह पोस्टमधून मुंबईकरांना मोलाचा संदेश दिला आहे. त्यांच्या पोस्ट नेहमीच चर्चेत देखील राहिल्या आहेत. सोशल मीडियावर या पोस्ट प्रचंड व्हायरल होत असतात. दरम्यान पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची जगजागृती करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

मुंबई पोलिसांनी लिहिलयं he Dose Not Know Defence. 83 या अपकमिंग सिनेमातील रणवीर सिंहचा हा डायलॉग आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. ट्रेलरमध्ये कपिल देव यांच्या तोंडी हे वाक्य आपल्याला पहायाला मिळालं. हेच वाक्य मुंबई पलिसांनी मास्क बाबात जनजागृती करण्यासाठी वापरलं आहे. ‘जेव्हा तुम्ही 83च्या मिलियन रिमाइंडरनंतरही  तुमचा मास्क घालत नाही’ तेव्हा he Dose Not Know Defence या रणवीरचा डायलॉग सह रणवीरचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

पहा मुंबई पोलिसांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)


मुंबई पोलिसांनी या पोस्टमधून लोकांना कोरोनापासून बचाव करणारा मास्क घालणं किती गरजेचं आहे हे सांगितले आहे. जोवर तुम्ही मास्क घातला आहे तोपर्यंत सुरक्षित आहात असे सांगण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी या पोस्टमधून केला आहे. हे समजावून सांगण्यासाठी मुंबई पोलिसांनी रणवीरच्या डायलॉगची मदत घेतली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या या पोस्टला आतापर्यंत १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या या पोस्टचं प्रचंड कौतुक केलं आहे. मुंबई पोलीस कमाल आहेत अशा कमेंट करण्यात आल्या आहेत. तर कोरोनाच्या काळात योग्यरित्या जनजागृती केली आहे.


हेही वाचा –  ओमायक्रॉनमुळे प्रवासी मार्गदर्शक सूचना स्वत:चे वेगळे नियम लावू नका!

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -