घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत एकही मृत्यू नाही; डेल्टापेक्षा कमी घातक ओमिक्रॉन,...

Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत एकही मृत्यू नाही; डेल्टापेक्षा कमी घातक ओमिक्रॉन, तज्ज्ञांचे मत

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता बऱ्याच देशांमध्ये पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ओमिक्रॉन जगातील २५ देशांमध्ये पसरला आहे. या व्हेरियंटची डब्ल्यूएचओने ‘व्हेरियंट ऑफ कंसर्न’मध्ये नोंद केली आहे. काही देशांनी ओमिक्रॉनच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केल्या आहेत. यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान डब्ल्यूएचओचे वैज्ञानिक आणि इतर वैज्ञानिक सातत्याने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर अभ्यास करत आहेत. ओमिक्रॉन हा व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा किती घातक आहे? याचा शोध घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. या रुग्णांवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना असे आढळले आहे की, ओमिक्रॉन हा जास्त वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे, मात्र याची लागण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कोरोनाच्या मृत्यूदरात कोणतीही वाढ झाली नाही.

- Advertisement -

हा व्हेरिएंट वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. मात्र संसर्ग होणारे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यू होण्याची नोंद झाली नाही. तसेच डब्ल्यूएचओने आज सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासांवर लावले गेलेले निर्बंध हटवण्याचे आवाहन करत म्हटले की, ‘निर्बंध लावण्यापेक्षा सावधगिरी बाळगली पाहिजे.’

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन झालेल्या रुग्णांच्या अहवालातून समोर आले की, ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त घातक नाही आहे. संक्रमित झालेल्या रुग्णांमधील गंभीर रुग्णांना डोके दुखी, चक्कर येणे आणि उच्च रक्तदाब याचा अनुभव आल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Omicronसोबत लढण्यासाठी SII बनवला कोविशिल्डचा बूस्टर डोस; DCGIकडे मंजूरीसाठी केली मागणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -