घरताज्या घडामोडीOmicron Variant: भारतातील २ ओमिक्रॉनग्रस्तांपैकी एकाने कर्नाटकातून थेट गाठली दुबई

Omicron Variant: भारतातील २ ओमिक्रॉनग्रस्तांपैकी एकाने कर्नाटकातून थेट गाठली दुबई

Subscribe

जगभरात सर्वत्र ओमिक्रॉनची दहशत पसरली असून सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने प्रवेश केला आहे. काल, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकामधील होते. यामधील एका ओमिक्रॉनग्रस्त रुग्णाने थेट दुबई गाठल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरू महापालिकेद्वारे जारी करण्यात आलेल्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमधून ही माहिती देण्यात आली आहे.

६६ वर्षांचा हा व्यक्ती २० नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि तो ७ दिवसांनंतर दुबईला गेला. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

- Advertisement -

भारतातून दुबईला कसा पोहोचला हा व्यक्ती?

  • दक्षिण आफ्रिकेतून हा व्यक्ती निगेटिव्ह अहवाल घेऊन २० नोव्हेंबरला भारतात पोहोचला होता. बंगळुरू विमानतळावर त्याची स्क्रीनिंग आणि चाचणी करण्यात आली होती.
  • मग २० नोव्हेंबरला त्याने एका हॉटेलमध्ये चेक इन केले. परंतु त्याची कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
  • त्यानंतर प्रशासनाकडून डॉक्टरांची टीम हॉटेलमध्ये पोहोचली. तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे दिसून आली नाहीत. त्याला हॉटेलमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.
  • २२ नोव्हेंबरला त्या व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले.
  • २३ नोव्हेंबर त्याने खासगी प्रयोगशाळेतून चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.
  • आतापर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या २४ जणांची चाचणी केली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
  • तसेच २३ नोव्हेंबरला २४० सेकेंडरी कॉन्टॅक्ट्सची तपासणी केली असता त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले.
  • त्यानंतर रुग्णाने २७ नोव्हेंबरला हॉटेलमधून चेक आउट केले आणि विमानतळावर जाण्यासाठी कॅब केली. मग त्याने दुबईचे विमान पकडले.

हेही वाचा – Omicron Variant: अमेरिकेत नव्या व्हेरिएंटचा वेग वाढला; न्यूयॉर्कमध्ये ओमिक्रॉनच्या ५ रुग्णांची नोंद


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -