घरताज्या घडामोडीOmicron Variant: अमेरिकेत नव्या व्हेरिएंटचा वेग वाढला; न्यूयॉर्कमध्ये ओमिक्रॉनच्या ५ रुग्णांची नोंद

Omicron Variant: अमेरिकेत नव्या व्हेरिएंटचा वेग वाढला; न्यूयॉर्कमध्ये ओमिक्रॉनच्या ५ रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आता जगभरात पसरू लागला आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. काल, गुरुवारी अमेरिकेत ओमिक्रॉनने एंट्री केल्याचे समोर आले होते. आता अमेरिकेत ओमिक्रॉनचा प्रसार वाढताना दिसत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात ओमिक्रॉनच्या पाच रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती राज्यपाल कॅथी होचुल यांनी दिली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नवीन केसेस न्यूयॉर्कच्या सफोक काउंटी, क्वीन्स, ब्रुकलिन आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये आढळल्या आहेत.

सफोक काउंटीमध्ये ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर क्वीन्समध्ये दोन, ब्रुकलिनमध्ये एक आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे आपात्कालीन आणीबाणीची घोषणा केली होती. न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहून आपत्कालीन आणीबाणीची घोषणा केली होती. राज्यपालांच्या या आदेशाचे शीर्षक ‘न्यूयॉर्क राज्यात आपत्कालीनची घोषणा’ असे होते.

- Advertisement -

आदेशात काय म्हटले आहे?

‘मी कॅथी होचुल (Kathy Hochul), न्यूयॉर्क राज्याची राज्यपाल. संविधान आणि न्यूयॉर्क राज्यच्या कायद्याद्वारे मला दिलेल्या अधिकाराच्या आधारावर कार्यकारी कायदा कलम २-बीच्या कलम २८नुसार मी १५ जानेवारी २०२२ पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी आपत्कालीन आणीबाणी घोषित करते. कारण मला न्यूयॉर्कमध्ये आपत्ती आल्यासारखे दिसत आहे. ज्यासाठी स्थानिक सरकार पुरेसा प्रतिसाद देऊ शकत नाही.’

दरम्यान वर्ल्डोमीटर्सच्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत २८ लाख ३९ हजार ४३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ५८ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख ५८ हजार ९९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक ४ लाख २२ हजार २४४ सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – ओमायक्रॉनचा देशात शिरकाव कर्नाटकात आढळले दोन रुग्ण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -