घरताज्या घडामोडीLIC Kanyadan Scheme : मुलीच्या लग्नासाठी LIC कडून नवीन स्कीम, १५१ रुपये...

LIC Kanyadan Scheme : मुलीच्या लग्नासाठी LIC कडून नवीन स्कीम, १५१ रुपये भरा आणि ३१ लाख मिळवा

Subscribe

मुलीच्या लग्नासाठी जर त्यांचे पालक पैशांची तडजोड करत असतील. तर त्यांना आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण मुलीच्या लग्नासाठी पैशांची रक्कम जर तिचे आई-वडील मोजत असतील. तर त्यांच्यासाठी LIC कडून एक स्कीम जाहीर करण्यात आली आहे. या स्किमचं नाव LIC Kanyadan Scheme असं आहे.

काय आहे LIC Kanyadan Scheme ?

LIC Kanyadan Scheme ही एक अशी स्कीम आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैशांची जोडणी करू शकता आणि ही स्कीम विशेषतः मुलींसाठी या योजनेअंतर्गत येते. त्यामुळे त्याला एलआयसीने कन्यादान योजना असे नाव दिले आहे.

- Advertisement -

पॉलिसीसाठी काय आहे पात्रता?

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय ३० वर्ष आणि मुलीचे वय १ वर्षापेक्षा कमी नसावे. या पॉलिसीची मुदत २५ वर्षे आहे. तर प्रीमियम २२ वर्षांसाठी भरावा लागणार आहे. तुमचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि मुलीचे वय १ वर्षापेक्षा जास्त असेल, तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?

– आधार कार्ड
– उत्पन्न प्रमाणपत्र
– ओळखपत्र
– पत्त्याचा पुरावा
– पासपोर्ट साईझ फोटो
– मुलीचे जन्म प्रमाणपत्र
– अर्जाचा नमुना (दुहेरी स्वाक्षरी केलेला)

- Advertisement -

प्रीमियम भरण्यासाठी तुम्ही चेक किंवा रोख देखील देऊ शकता. जर तुम्ही कन्यादान पॉलिसीमध्ये दररोज १५१ रुपये भरत असाल तर एका महिन्यात ४५३० रुपये गुंतवावे लागणार आहेत. पॉलिसीचा प्रीमियम २२ वर्षांचा असल्याने पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला त्याच्या मॅच्युरिटीवर ३१ लाख रुपये मिळू शकतात.


हेही वाचा : मानसिक आरोग्य यांसारख्या आजारांवर उपचार करणं महत्त्वाचं – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -